Riteish Deshmukh Ganesh Chaturthi Celebration Saam TV
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh Post: रितेश देशमुखची लय भारी क्रिएटिव्हिटी! गॅरेजमधील टाकाऊ वस्तूंपासून साकारला बाप्पा

Riteish Deshmukh Celebration: अभिनेता रितेश देशमुखने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Riteish Deshmukh Celebrated Ganesh Chaturthi With Kids:

गणेशोत्सवाची जल्लोषात सुरुवात झाली आहे. सगळ्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. आता एक-एक करून बाप्पासोबाचे फोटो सर्वजण पोस्ट करत आहेत. यात सेलिब्रटी देखील मागे नाहीत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घराच्या बाप्पासह फोटो शेअर केले आहेत.

अभिनेता रितेश देशमुखने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेशने बाप्पा कसा तयार केला हे देखील दाखवाल आहे.

रितेश देशमुख पोस्ट

रितेश देशमुख याने शेअर केलेल्या व्हिडीओची 'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीने होत आहे. त्याचा मुलगा राहील हे आरती गात आहे. त्यानंतर व्हिडीओमध्ये पुढे रितेश त्यांच्या मुलांसह गॅरेजमधल्या वास्थुचा वापर करून काहीतरी बनवताना दिसत आहे.

रितेश देशमुखसह या व्हिडीओ लहान मुले दिसत आहेत. ही लहान मुले देखील त्याला त्याच्या कामात मदत करत आहेत. हे सगळेजण मिळून काय करत असतील असं तुम्हाला वाटतं? बरोबर या सगळ्यांनी गॅरेजमधील टाकाऊ वस्तूंपासून गणपतीची मूर्ती बनवली आहे.

कार, बाईक आणि सायकल यांचा विविध पार्ट्सचा वापर करून रितेश देशमुख आणि त्याच्या बच्चे कंपनीने खूप सुंदर गणपतीची मूर्ती बनवली आहे. या सगळ्यांनी मूर्ती फक्त बनवली नाही तर ती पूजेला देखील लावली आहे.

या संपूर्ण व्हिडीओ रितेश देशमुखनं गणपतीची मूर्ती कशी बनवली. त्यात त्याला कोणी मदत केली. तसेच त्यांच्या घरी केले बाप्पाचे डेकोरेशन दाखवले आहे. व्हिडीओमध्ये त्यांना मुलांनी गायलेली आरती बॅकग्रांउडमध्ये वापरता आहे.

रितेश देशमुखच्या या अनोख्या उपक्रमाचे आणि भारी बाप्पाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अभिनेता अजिंक्य राऊतने 'किती भारी अशी कमेंट या व्हिडीओवर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT