Rhea Chakraborty Net Worth  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rhea Chakraborty Turns 31: चित्रपट फ्लॉप; तरीही घेते लाखोंचे मानधन! रिया आहे तब्बल इतक्या कोटींची मालकिण

Rhea Chakraborty Net Worth: रिया चक्रवर्तीचा आज ३१ वा वाढदिवस असून ती एका चित्रपटासाठी किती मानधन घेते जाणून घेऊया ...

Chetan Bodke

Rhea Chakraborty Birthday News: दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या निधनानंतर गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती बरीच चर्चेत आली होती. अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty Birthday News) ही तिच्या अभिनयामुळे नाही तर, काही वादविवादांमुळे सर्वाधिक चर्चेत आली. अभिनेत्रीने आपल्या अभिनय कारकिर्दिला टीव्ही इंडस्ट्रीतून सुरूवात केली होती. रिया चक्रवर्तीच्या वैयक्तिक आयुष्यातच नाही तर, व्यावसायिक आयुष्यातदेखील अनेक चढ-उतार तिने पाहिले आहेत.

रिया टॉलिवूडसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही तिने मुख्य भूमिका साकारली. हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच अभिनेत्रीने चित्रपट केले असून त्यात ते सर्व चित्रपट फ्लॉप. चला तर जाणून घेऊया ती एका चित्रपटासाठी किती मानधन घेते...

आज रिया चक्रवर्ती आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत असून तिचा जन्म बंगळुरूमध्ये झाला आहे. रियाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. रियाने आपल्या आपल्या फिल्मी करियरची सुरूवात व्हिडीओ जॉकी म्हणून केली आहे. तिने अभिनयक्षेत्रात काम देखील केले, पण तिला त्यात फारसे यश मिळाले नाही. तिने केलेल्या सर्वच चित्रपटात यश मिळाले नसले तरी रिया चक्रवर्ती कोट्यवधींची मालकिण आहे.

२००९ मध्ये एमटीव्हीवरील या रिॲलिटी शो ‘TVS Scooty Teen Divas’ मधून तिने डेब्यू केला. सोबतच रियाने अनेक शोची होस्टिंगदेखील केली आहे.२०१२ मध्ये ‘टुनिगा टुनिगा’या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण केले.

एका वर्षानंतर, रियाने ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. यानंतर देखील रियाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करू शकले नाहीत. जरी तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप झाले तरी, ती एका चित्रपटासाठी लाखो रूपयांचे मानधन आकारते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिया चक्रवर्ती एका महिन्यात २.५ लाख रुपयांहून अधिकची कमाई करते. तर ती एका वर्षात ३० लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे कमावते. चित्रपटांव्यतिरिक्त ती ब्रँड अँडोर्समेंटद्वारे कमाई करते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिया चक्रवर्तीची एकूण संपत्ती सुमारे १.५ मिलियन डॉलर म्हणजेच ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रिया चक्रवर्ती मुंबईत एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्या त्या घराची किंमत ८५ लाख रुपये इतकी आहे.

ट्रेड ॲनालिस्टनुसार, रियाला अलिशान गाड्यांची फारच आवड आहे. तिच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - बदलापूर रेल्वे स्थानकात बसवले जुनेच सरकते जिने

Pink E- Rickshaw Scheme: पिंक रिक्षा योजना काय आहे? कोणाला मिळते ही रिक्षा

Ghashiram Kotwal: 'घाशीराम कोतवाल' हिंदी रंगभूमीवर; ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा झळकणार मुख्य भूमिकेत

Madhuri Elephant : माधुरी हत्तीला गुजरातला हलविल्याचा निषेध; जैन समाजाकडून आंदोलन, रिलायन्स उत्पादनावर बहिष्काराचा केला ठराव

Malegaon Blast Verdict: दहशतवाद आणि जिहादचा रंग हिरवाच; मालेगाव खटल्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT