Deepika- Ranveer Delivery Photo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika- Ranveer Delivery Photo : बेडवर दीपिका झोपलेली, रणवीरच्या हातात बाळ; सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा, व्हायरल फोटोमागील सत्य काय?

Deepika Padukone And Ranveer Singh Delivery Viral Photo : सोशल मीडयावर दीपिका आणि रणवीरचा एक हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

येत्या सप्टेंबर महिन्यात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई- बाबा होणार आहेत. सेलिब्रिटी कपलने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यापासूनच चाहत्यांमध्ये त्यांच्या बाळाची जोरदार चर्चा सुरू आहे. दीपिका आणि रणवीरने फेब्रुवारी महिन्यांत चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली होती. तेव्हापासून दोघेही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.

मध्यंतरी दीपिका गरोदर नसल्याच्या चर्चा सुरू होत्या, तिचा बेबी बम्पही खोटा असल्याच्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा झाल्या होत्या. आता तर नेटकऱ्यांनी हद्दच पार केली आहे. सध्या सोशल मीडयावर दीपिका आणि रणवीरचा एक हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल होत आहे.

या कपलचा हा हॉस्पिटलमधील फोटो तुफान व्हायरल होत असून दोघांवरही कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका आणि रणवीर सिंगचा हॉस्पिटलमधील एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये रणवीरच्या हातात बाळ दिसत असून दीपिका हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेली दिसते. रणवीर आपल्या बाळाचा कॅमेऱ्यासमोर दाखवताना दिसत आहे. पण हे खोटं आहे. हा फोटो मॉर्फ करण्यात आला असून व्हायरल फोटोपाहून नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत.

Deepika Padukone And Ranveer Singh Delivery Viral Photo

अभिनेत्री गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक सार्वजनिक ठिकाणी बेबीबंप फ्लॉंट करताना स्पॉट झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी, चित्रपटाच्या प्रमोशनवेळी किंवा डिनर डेटला जात असताना दीपिका आणि रणवीर स्पॉट झाले होते. यावेळी रणवीर दीपिकाची विशेष काळजी घेताना स्पॉट झाला. 'कल्की २८९८ एडी'च्या प्रमोशनवेळी दीपिकाने खास ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट कॅरी केला होता. त्या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप दिसत होता.

विशेष म्हणजे, दीपिका प्रेग्नेंट असतानाही 'सिंघम अगेन' या ॲक्शनपटाची शुटिंग करत होती. यामुळे तिचे कौतुकही झाले होते. त्यासोबतच अनेकदा दीपिकाला नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं होतं. दीपिकाने प्रेग्नेंसीच्या काळात काही इव्हेंटमध्ये हाय हिल्स सँडल कॅरी केली होती. त्यामुळेही ती ट्रोल झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

SCROLL FOR NEXT