Ratris Khel Chale Fame Actor Suhas sirsat got married  
मनोरंजन बातम्या

Ratris Khel Chale Fame Actor Got Married : रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्याने दुसऱ्यांदा केले लग्न: बायको आहे प्रसिद्ध अभिनेत्री

Suhas Sirsat : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुहास व स्नेहाने पुन्हा एकदा लग्न केले.

Pooja Dange

Famous Marathi Actor Got Married: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले' खूप गाजली होती. या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहेत. मालिका संपली तरी प्रेक्षक सोशल मीडियावर कलाकारांना फॉलो करत असतात. मालिकेतील दत्ता म्हणजे सुहास शिरसाट सध्या चर्चेत आला आहे. दत्तने पुन्हा एकदा लहान केले आहे.

मालिकेतील कलाकार नेहमीच सोशल मीडियावर काही न काही शेअर करत असतात. अशातच सुहास शिरसाटने नुकताच त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्याचा व्हिडिओ सुहासने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओत त्यांने पुन्हा एकदा बायकोशी लग्नगाठ बांधली आहे. (Latest Entertainment News)

सुहासची बायको स्नेहा माजगावकर हीदेखील उत्तम अभिनेत्री आहे. स्नेहा सध्या झी मराठीवरील 'तू चाल पुढं' या मालिकेत प्राजक्ता हे पात्र साकारत आहे. ९ जूनला सुहास आणि स्नेहाच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांच्या मित्रांनी आणि कुटुंबियानी त्यांना एक सरप्राइज दिले आहे. त्याचाच व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत सर्वजण धमाल-मस्ती करताना दिसत आहे. (Celebrity)

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुहास व स्नेहाने पुन्हा एकदा लग्न केले. डोक्याला मुंडावळ्या बांधून एकमेकांच्या गळ्यात हार घातला आहे. त्यानंतर केक कापून सेलिब्रेशन केले आहे. हे दोघेही एकमेकांना हार घालताना एकदम साध्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. त्यांचे घरही त्यांच्या फोटोने छान सजवलेले दिसत आहे.

स्नेहाने एक व्हिडिओ शेअर करत, "लग्नाच्या दहा वर्षांनंतर त्याच दिवशी आम्हाला गोड माणसांकडून एक गोड सरप्राइज मिळालं. त्यांनी आमचं पुन्हा लग्न लावून दिलं. ९ व १० जून हे दोन दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

९ जूनला लग्नाचा वाढदिवस. तर १० जूनला सुहासचा वाढदिवस. हे दोन्ही दिवस या माणसांमुळे अगदी आनंदाचे गेले. सगळ्यांना खूप सारं प्रेम."असं खास कॅप्शन देत मित्रमंडळी व कुटुंबियांचे आभार मानले आहेत.

स्नेहा आणि सुहासच्या या हटके सेलिब्रेशनवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (TV Serial)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT