Rashmika Mandanna Has 5 houses  Instagram@RashmikaMandanna
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna Comment: बापरे! अवघ्या ५ वर्षांच्या करियरमध्ये रश्मिकाने घेतली ५ घरे? अभिनेत्रीने सांगितले खरी कहाणी

Pushpa Fame Actress: अवघ्या २७ वर्षाच्या रश्मिकाची भारतातील ५ शहरामध्ये आलिशान घरे आहेत.

Pooja Dange

Rashmika Mandanna Birthday: रश्मिका मंदाना संपूर्ण भारताची फेव्हरेट अभिनेत्री झाली आहे. आज रश्मिकाचा वाढदिवस आहे. रश्मिकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ साली झाला आहे. अवघ्या २७ वर्षाच्या रश्मिकाची भारतातील ५ शहरामध्ये आलिशान घरे आहेत.

रश्मिकाची सर्व घरे आलिशान आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, बंगलोर, हैद्राबाद, कूर्ग आणि गोवा या शहरात रश्मिकाची घरे आहेत. परंतु रश्मिकाने हे बातमी खोडून काढली आहे.

एका पोस्टवर कमेंट करताना रश्मिकाने हा दावा फेटाळून काढला आहे आणि लिहिले की, हे खरं असतं तर. रश्मिकाला लक्झरी लाईफस्टाईलची आवड आहे. पण, पाच शहरांमध्ये आलिशान घर असणं हे तिचंही स्वप्न आहे. अभिनेत्रीच्या या उत्तराने एका झटक्यात स्पष्ट केले की सोशल मीडियावर तिच्याबद्दल किती अफवा पसरत आहेत.

रश्मिकाच्या स्वप्नातील पाच नाही पण 2 घरे नक्कीच आहेत. अलीकडे, पुष्पा फेम अभिनेत्रीने तिच्या गोव्यातील घराचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. यासोबतच एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. रश्मिकाच्या सोशल मीडियावरून तिची लक्झरी लाइफस्टाइलचा आपल्याला सहज लक्षात येऊ शकते. सोशल मीडियावर रश्मिका अनेकदा तिच्या घरातील सुंदर फोटो शेअर करत असते.

रश्मिका मंदान्ना सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू या चित्रपटात दिसली होती. आता ती तिच्या पुढच्या अॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच तिचे साऊथमध्ये देखील काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

रश्मिका काही दिवसांपूर्वी झालेल्या झी चित्रगौरव सोहळ्यादेखील उपस्थित होती. यावेळी तिने सादरीकरण देखील केले. तसेच मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा सुद्धा बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saiyaara worldwide collection : 'सैयारा' सुसाट! बॉक्स ऑफिसवर जादू कायम, वर्ल्डवाइड कलेक्शन 400 कोटींपार

Silent heart attack risk: सायलेंट हार्ट अटॅकपूर्वी शरीरात होतात हे बदल; कोणाला असतो जास्त धोका, जाणून घ्या

Maharashtra Live News Update: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून आणखी ६१,१४६ महिलांचे अर्ज बाद, तुमचं नाव नाही ना?

Manikrao Kokate : रोहित पवारांनी आणखी एक पत्ता काढला, कृषीमंत्र्यांवर केला गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT