Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Pics Saam Tv
मनोरंजन बातम्या

साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna कुठे फिरतायत?, फोटो झाले व्हायरल

Priya More

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Pics:

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. विजय आणि रश्मिका एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. हे कपल अनेक वेळा एकत्र स्पॉट देखील झाले आहेत. आता हे कपल साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण अद्याप या कपलने त्यांच्या नात्यावर मौन सोडले नाही. याच दरम्यान, विजय आणि रश्मिका चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटोंवरून हे कपल सध्या विएतनाममध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करत असल्याच्या चर्चा होत आहेत.

काही दिवसांपूर्वीच साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये विजय देवराकोंडा क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये विजय देवरकोंडा स्ट्रीट फूड खात असताना हसताना दिसत आहे. या फोटोंमध्ये तो खूपच आनंदी दिसत आहे. हे फोटो पाहून नेटकरी म्हणत आहेत की, तो रश्मिका मंदान्नासोबत सुट्ट्या इन्जॉय करत आहे. विजय देवराकोंडाच्या या फोटोंवर नेटकरी जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'रश्मिका मंदान्ना या हसण्याचे कारण आहे का?' तर काही नेटकऱ्यांनी विजयचा हा फोटो रश्मिकानेच काढला असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी साखरपुडा कधी असा देखील सवाल केला आहे.

तर दुसरीकडे, रश्मिका मंदान्नाने देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. तिने या पोस्टमध्ये सांगितले की, तिला हॅट खूपच आवडते. जी तिने घातली असून ती हॅट ती घरी देखील घेऊन जाणार आहे. रश्मिका आणि विजयचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोंवरून हे दोघेही एकत्र फिरत असल्याचे म्हटले जात आहे. दोघंही साखरपुड्यापूर्वी क्वालिटी टाईम स्पेंड करत असल्याचे म्हटले जात आहे. पण यावर फक्त चर्चा होत आहे. या दोघांकडून यावर काहीच प्रतिक्रिया आली नाही.

दरम्यान, साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना लवकरच साखरपुडा करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण हे फक्त अनुमान आहेत. आतापर्यंत विजय आणि रश्मिकाने या प्रकरणी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. रश्मिका मंदान्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याची माहिती आहे. रश्मिका अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. रश्मिकाच्या प्रत्येक फोटोवर नेटिझन्स मनापासून प्रेमाचा वर्षाव करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT