Ranveer Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh: 'धुरंधर' नंतर रणवीर सिंहची मोठी तयारी! 'या' पुस्तकावर आधारित सिनेमामध्ये साकारणार महादेवाची भूमिका

Ranveer Singh: रणवीर सिंह ‘द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’वर आधारित चित्रपटात भगवान शिवाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र लेखक अमीश त्रिपाठी यांनी अद्याप कोणताही करार झालेला नसल्याचे स्पष्ट केले.

Shruti Vilas Kadam

Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह पुन्हा एकदा मोठ्या प्रोजेक्टमुळे चर्चेत आला आहे. ‘धुरंधर’ चित्रपटाच्या यशानंतर आता रणवीर सिंह भगवान शिवाच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. प्रसिद्ध लेखक अमीश त्रिपाठी यांच्या लोकप्रिय कादंबरी ‘द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’वर आधारित भव्य चित्रपट ट्रिलॉजीमध्ये रणवीर मुख्य भूमिका साकारणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर सिंहने आपल्या ‘माँ कसम फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत या कादंबरीचे हक्क विकत घेतले असून, बिरला स्टूडियोसोबत मिळून हा मोठा प्रोजेक्ट विकसित केला जात आहे. या ट्रिलॉजीत रणवीर भगवान शिवाची भूमिका साकारणार असल्याची माहितीही समोर आली आहे. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट आणि वर्ल्ड बिल्डिंगवर काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र या चर्चांदरम्यान अमीश त्रिपाठी यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’ किंवा संपूर्ण ‘Shiva Trilogy’चे हक्क अद्याप त्यांच्याकडेच आहेत आणि कोणासोबतही अधिकृत करार झालेला नाही. रणवीर सिंहबद्दल आदर असल्याचे सांगत त्यांनी या बातम्यांमधील दाव्यांना नकार दिला.

दरम्यान, सोशल मीडियावर या संभाव्य प्रोजेक्टबद्दल मोठी चर्चा रंगली आहे. अनेक चाहत्यांनी रणवीर सिंह भगवान शिवाच्या भूमिकेत कसा दिसेल, याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. काहींनी तर या चित्रपटाची तुलना आगामी मोठ्या मायथॉलॉजिकल सिनेमॅटिक युनिव्हर्सशी केली आहे.

‘द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’ ही अमीश त्रिपाठी यांच्या लोकप्रिय ‘Shiva Trilogy’ मालिकेतील पहिली कादंबरी आहे. या कथेत भगवान शिवाला एका सामान्य मानवाच्या रूपात दाखवण्यात आले असून, पुढे ते ‘नीलकंठ’ म्हणून ओळखले जातात. या पुस्तकाला देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आता रणवीर सिंह खरोखरच या प्रोजेक्टचा भाग होणार का, याबाबत अधिकृत घोषणा कधी होते याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT