Ranveer Singh shares The Secret  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh Share Video : रणवीर सिंगने रिव्हील केलं मोठं सिक्रेट ; दीपिका - राम चरणला पाहून धक्का बसेल

Ranveer Singh Unveil The Secret : रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Ranveer Singh Share The Secret Of Deepika - Ram Charan : अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या रॉकी ओर रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. करण जोहर दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाची चर्चा होत असताना रणवीरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे तुम्हाला अनेक प्रश्न पडतील.

रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'रहस्य उघड' असे कॅप्शन दिले असून 'शो मी द सिक्रेट' हा हॅशटॅग आणि टॅग वापरला आहे. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. (Latest Entertainment News)

रणवीरने शेअर केलेल्या व्हिडिओची सुरूवात, दीपिकापासून होते. ती पोलीस अधिकाऱ्याला माझा नवरा काळ रात्रीपासून हरवला असल्याचे सांगत आहे. त्यानंतर आपल्याला रणवीर दिसतो. रणवीर फोनवर असलेल्या त्याच्या वरिष्ठांना सांगतो, सर टार्गेट फाऊंड. त्यानंतर आपल्याला कुणाचा तरी पाठलाग करताना राम चरण दिसतो. तर त्यानंतर त्रिशा कृष्णन आपल्याला दिसते.

हा व्हिडिओ जितका इंटरेस्टिंग आहे तितकेच या व्हिडिओमधील कलाकार आहे. 'द सिक्रेट' हा नवीन प्रिजेक्ट घेऊन रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, राम चरण आणि त्रिशा कृष्णन आपल्या भेटीला येत आहे.

राम चरण बॉलिवूड कलाकारांनसोबत दिसल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि बॉलिवूड कलाकार यांचं हे नवीन समीकरण खूप भारी असणार आहे हे या छोट्या व्हिडिओ वरून लक्षात येत आहे.

'द सिक्रेट' विषयी अधिक माहिती आपल्याला ५ जुलैला कळणार आहे. रणवीरने शेअर केलेल्या या व्हिडिओ फॅन्सच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. या नवीन प्रोजेक्टमधील कास्ट पाहून नेटकरी खूप उत्सुक आहेत.

रणवीरच्या आलियासोबत रॉकी ओर रानी की प्रेम कहानीमध्ये दिसणार आहे. तर दीपिका पदुकोन पहिल्यांदाच फायटर या चित्रपटातून हृतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

राम चरण नुकताच बाबा झाला असून तो त्याचे पॅरेन्टहूड एन्जॉय करत आहे. त्याच्या मुलीचा बारसं झाला असून कलिन कारा असे तिचे नाव ठेवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

SCROLL FOR NEXT