सूर्यवंशी पाठोपाठ रणवीर सिंगच्या 83 चित्रपटाची घोषणा Twitter/@RanveerOfficial
मनोरंजन बातम्या

सूर्यवंशी पाठोपाठ रणवीर सिंगच्या 83 चित्रपटाची घोषणा

रणवीर सिंग आणि कबीर खान यांचा बहुचर्चित 83 सिनेमा येत्या ख्रिसमसला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यात आता शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृह आणि नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे, आता लवकरच अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील जाहीर होणार असल्याचे दिसून येते.

हे देखील पहा -

अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपटाच्या घोषणेनंतर आता रणवीर सिंग आणि कबीर खान यांचा बहुचर्चित 83 सिनेमा येत्या ख्रिसमसला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. काल राज्य सरकारने २२ ओकटोबरपासून सिनेमागृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकीकडे रोहित शेट्टी यांनी आपल्या सूर्यवंशी सिनेमाची घोषणा केली तर दुसरीकडे आता कबीर सिंग यांनी 83 या चित्रपटाची घोषणा केली आहे.

कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे अडकलेला हा चित्रपट आतादिवाळीत प्रदर्शित होणार आहे. कालचं राज्य सरकारने येत्या २२ ऑक्टोबरपासून सिनेमागृह आणि नाट्यगृह उघडण्याचे निर्णय घेतला आणि त्यानंतर निर्माता रोहित शेट्टी यांनी सुर्यवंशी चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली. अक्षय कुमार यांनी ट्विट करुन सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले तर रणवीर सिंगने ट्विट करत 83 हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT