Anagha Atul Started Restaurant In Pune Saam TV
मनोरंजन बातम्या

Anaghaa Atul Hotel- अनघा अतुलच्या 'वदनी कवळ'चा शुभारंभ; हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांना अभिनेत्रीनं स्वतः वाढलं जेवण

Rutuja Bagwe Share Video: अभिनेत्री ऋतुजा बागवेने अनघाच्या हॉटेलची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Pooja Dange

Marathi Celebrity Attend Anaghaa Atul Restaurant Opening:

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री अनघा अतुलने मालिका संपल्यानंतर 'नवीन सुरुवात करत आहे', अशी पोस्ट केली होती. अनघाने भावासोबत उद्योग क्षेत्रात पदार्पण करत असल्याचे सांगितले होते.

पुण्यातील डेक्कन भागात अनघाने तिच्या भावासोबत हॉटेल सुरू केलं आहे. 'वदनी कवळ' असे तिच्या हॉटेलचे नाव आहे. १९ ऑक्टोबरला या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले.

अनघा अतुलच्या हॉटेलच्या उद्घाटन सोहळा मराठी सिनेसृष्टीतील तिचा मित्रपरिवार उपस्थित होता. अभिनेत्री ऋतुजा बागवेने अनघाच्या हॉटेलची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच तिला तिच्या या नवीन सुरुवातीला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हिडीओ असे लक्षात येते ऋतुजा बागवे आणि अनघा अतुल एकमेकींचा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अनघाच्या नवीन प्रवासात साथ देण्यस्तही अभिनेत्री ऋतुजा बागवे हॉटेलच्या उद्घाटन उपस्थित होती. 'वदनी कवळ'मध्ये आलेल्या ऋतुजाला अनघा स्वतःच्या हाताने जेवण वाढत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अनघा अतुलने शुद्ध शाकाहारी पारंपरिक जेवणाचं आस्वाद घेता यावा यासाठी 'वदनी कवळ' हे हॉटेल सुरू गेले आहे. ऋतुजाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जेवणाची भरलेली प्लेट दिसत आहे. तर अभिनेत्री अनघा ऋतुजाला सीताफळ राबडी वाढत आहे. (Latest Entertainment News)

अनघा अतुल आणि इच्या भावाला शुभेच्छा देत ऋतुजाने लिहिले आहे की, 'तुझ्यासाठी खूप खुश आहे. तुमच्या दोघांचा खूप अभिमान वाटतो. तुम्हाला खूप शुभेच्छा खूप प्रेम.'

अनघा अतुलला शुभेच्छा देण्यासाठी 'रंग माझा वेगळा' मालिकेतील तिचे सहकालकर आशुतोष गोखले आणि अनुष्का पिंपुटकर देखील हॉटेलच्या उद्घाटनाला उपस्थित होते. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

SCROLL FOR NEXT