Rang Maza Vegla Fame actress Started New Business Instagram @anaghaa_atul
मनोरंजन बातम्या

Anagha Atul Post: 'पुणेकरांच्या ह्रदयात थोडी जागा करायचीय...' 'रंग माझा वेगळा' मालिकेने निरोप घेताच अभिनेत्रीने निवडली नवी वाट

Rang Maza Vegla Fame Actor: 'रंग माझा वेगळा' या मालिकेतील श्वेता म्हणजे अनघा अतुलने गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नवीन सुरुवात केली आहे.

Pooja Dange

Marathi Actress Started News Hotel In Pune:

'रंग माझा वेगळा' या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता या मालिकेतील कलाकार कोणत्या नव्या मालिकेत, चित्रपटात किंवा नाटकात दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

'रंग माझा वेगळा' या मालिकेतील एका अभिनेत्रीने ती पुढे काय करणार याचे अपडेट शेअर केले आहेत. अभिनेत्री आता उद्योजिका म्हून आपल्या भेटीला येणार आहे.

'रंग माझा वेगळा' या मालिकेतील श्वेता म्हणजे अनघा अतुलने गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नवीन सुरुवात केली आहे. अनघा अतुलने तिच्या भावासोबत हॉटेल सुरू करणार आहे. पुण्यातील डेक्कन येथे अभिनेत्री नवीन हॉटेल सुरू करणार आहे.

अनघा अतुलने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या नवीन कामाची माहिती दिली आहे. अनघाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'वक्रतुण्ड महाकाय

सूर्यकोटि समप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव

सर्वकार्येषु सर्वदा ॥

असं म्हणतात कुठल्याही कार्याची सुरूवात बाप्पाच्या नावाने करतात. त्यात बाप्पाच्या आगमनाचा दिवस असेल याहुन मंगल दिवस नाही.

गेले काही दिवस एकच प्रश्न विचारला जातोए , “आता पुढे काय?” तर यापुढे पुणेकरांच्या ह्रदयात थोडी जागा निर्माण करायचं ठरवलय! मी आणि माझा भाऊ घेऊन येतोए “वदनी कवळ” परिपूर्ण थाळीचा आस्वाद. शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण. In the heart of Pune, Deccan. लवकरच येतय तुमच्या भेटीला.

खूप धाडस करुन हे पाऊल उचलते आहे. अभिनेत्री म्हणून खूप प्रेम मिळालं आता उद्योजिका म्हणून तुमच्या सहकार्याची, प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे. ।।गणपती बाप्पा मोरया।।'

अनघा अतुल 'भगरे गुरुजी' यांची मुलगी आहे. तिने पुनातील डेक्कन येथे ' वदनी कवळ' हे हॉटेल सुरु करणार आहे. अनघाने शेअरकेलेल्या फोटो मध्ये त्यांच्या नवीन हॉटेलचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. अनघाने तिचा भाऊ अखिलेशच्या मदतीने हा नाव व्यवसाय सुरु केला आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT