Ranbir Kapoor Animal Movie Viral Video
Ranbir Kapoor Animal Movie Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor Video: अ‍ॅनिमलच्या सेटवरील रणबीर कपूरचा व्हिडिओ लीक, चाहत्यांमध्ये वाढली चित्रपटाविषयी उत्सुकता

Pooja Dange

Ranbir Kapoor's Video From Sets Of Animal Leaked: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. एकीकडे तो बाप झाल्याचा आनंदात आहे, तर दुसरीकडे श्रद्धा कपूरसोबत त्याचा 'तू झुठी मैं मक्कर' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पण रणबीर यावेळी चर्चेत असण्याचे कारण म्हणजे त्याचा आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'अ‍ॅनिमल'. या चित्रपटामध्ये तो चॉकलेटी बॉय इमेज दिसणार असून अॅक्शन अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. तर प्रेक्षकांची सर्वांची उत्सुकता वाढवण्यासाठी आणखी एक घटना घडली आहे. 'अॅनिमल'च्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला असून, सध्या इंटरनेटवर याने खळबळ उडाली आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच तारखेला म्हणजेच 1 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल'च्या फर्स्ट लूक पोस्टरने सर्वांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली होती. यासोबतच रणबीर या चित्रपटात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे. हातात कुऱ्हाड, तोंडात सिगारेट घेऊन रक्ताने माखलेला रणबीर पाहून लोकांमध्ये ‘अ‍ॅनिमल’ची चर्चा आणखी वाढली आहे. आता, 'अॅनिमल'च्या सेटवरून एका लीक झालेल्या व्हिडिओने या चर्चा चर्चा अधिक वाढल्या आहेत. रणबीर चित्रपटात केवळ अॅक्शन नाही तर बरेच काही करताना दिसणार आहे.

'अॅनिमल'च्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला आहे, ज्यामध्ये रणबीर नेव्ही ब्लू थ्री पीस सूट, लांब केस आणि दाढीमध्ये एका सीक्वेन्ससाठी शूटिंग करताना दिसत आहे. अभिनेत्याने स्टेटमेंट रेट्रो सनग्लासेससह त्याच्या लूकला पूर्ण केले आहे. यासोबतच अभिनेता व्हिडिओमध्ये स्मोकिंग करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ दिल्लीतील 'अॅनिमल'च्या शूटिंगचा व्हिडिओ आहे, असे सांगण्यात येत आहे. विशेष आजकाल रणबीर कपूरमध्ये एक ऊर्जा पाहायला मिळत आहे, ही ऊर्जा त्याचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट हिट झाल्यामुळे दिसत आहे.

रणबीर कपूरच्या एका चाहत्याने 'अॅनिमल'चा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर येताच चाहते कमेंट करून रणबीरच्या नव्या लूकचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'रणबीर कपूर अॅनिमल शूटसाठी त्याच्या खराब लूकमध्ये दिसत आहे.' दुसरा म्हणाला, 'व्वा! हा वेगळ्या पातळीवरचा चित्रपट असू शकतो. तसेच तिसर्‍याने नेटकाऱ्याने कमेंट करत लिहिले की, 'BTS खूप दमदार आहेत, मग हा सीन सिनेमात किती मस्त असेल.'

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील 'अर्जुन रेड्डी' या सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट संपूर्ण देशभर हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT