Ranbir Kapoor's Animal Movie Pre-Teaser Released  Saam TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor's Animal Pre-Teaser Out : ॲनिमल प्री-टीजर प्रदर्शित: रणबीरचा थरार पाहून अंगावर येईल काटा

Ranbir Kapoor In Action Mode: ॲनिमल चित्रपटाच्या प्री-टीझरमध्ये रणबीर अॅक्शन-पॅक अवतारात दिसत आहे.

Pooja Dange

Ranbir Kapoor's Animal Pre-Teaser Released: रणबीर कपूरच आगामी चित्रपट ॲनिमल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा देखील आहे. या चित्रपटाचा प्री-टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

रणबीर कपूरचा ॲनिमल चित्रपटाची त्याच्या लूक रिव्हील झाल्यापासून प्रचंड चर्चा होती. चॉकलेट बॉय अशी ओळख असणाऱ्या रणबीरचा 'ॲनिमल' मधील लूक पाहून सगळेच चकित झाले होते. (Latest ENtertainment News)

ॲनिमलचा प्री-टीजर

रणबीर कपूरच्या ॲनिमल चित्रपटाचा प्री-टीजर प्रदर्शित झाला आहे. प्री-टीजर पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. प्री-टीजरची सुरुवात स्कलचे मास्क घातलेल्या काही लोकांपासून होते. त्यांच्या हातात कुऱ्हाडी आहेत. त्यानंतर भिंतीवर लटकलेली कुऱ्हाड दिसते. नंतर सुटाबुटातील काही गायक पंजाबी गाणे गाऊ लागतात.

गाणे सुरू झाल्यानंतर रणबेररची एन्ट्री होते. भिंतीवरील कुऱ्हाड घेऊन रणबीर फुल ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. तर रणबीरचा लूक देखील लक्ष वेधून घेण्यासारखे आहे. रणबीरच्या चेहऱ्यावर जखमा तर आहेतच परतून तो लुंगीत दिसत आहे. आणि लुंगी घालून तो मारामारी करताना दिसत आहे. समशेरानंतर आता ॲनिमलमध्ये रणबीरचा हा अवतार पाहायला मिळत आहे.

"अ‍ॅनिमल" या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा प्री-टीझर खूपच रोमांचित करणार आहे. यामुळे चित्रपटाच्या कथेची, टीजर आणि ट्रेलरची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत आहेत.

11 ऑगस्ट 2023 रोजी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम या 5 भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीज, मुराद खेतानी यांचा सिने1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्स यांनी अॅनिमल'ची निर्मिती केली आहे. तर संदीप वांगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला संधी, कुणाला मिळाला डच्चू? IND vs UAE सामन्यात अशी आहे टीम इंडियाची Playing XI

राज - उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी काय? बघा VIDEO

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT