Ranbir Kapoor
Ranbir Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor: रणबीर कपूरला झालं तरी काय? सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा मोबाइल रागानं फेकला, नेटकरी भडकले

Chetan Bodke

Ranbir Kapoor: अभिनेता रणबीर कपूर आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चाहत्यांमध्ये रणबीरची क्रेझ बरीच वेगळी आहे. पण, नुकतेच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत रणबीरने फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याचा फोनच फेकून दिला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत असून रणबीर कपूर त्याच्या चाहत्यांसोबत दिसत आहे.

नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत, एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी घेतो, पण रणबीर कपूर त्याचा फोन मागे फेकतो. या व्हिडीओमागचे सत्य काय आहे, हे अद्याप समोर आलेले नसले तरी नेटकरी रणबीरवर चांगलेच संतापले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ एका इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

एका चाहत्याने रणबीरसोबत सेल्फी काढल्याचे दिसत आहे. रणबीरही आनंदाने पोज देतो. पण यानंतर यूजर पुन्हा सेल्फी घेतो. यानंतर रणबीर चाहत्याच्या हातातून मोबाईल घेतो आणि मागे फेकतो. यादरम्यान रणबीरच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसुन येत आहे. रणबीरला असे वागताना पाहून यूजर्स बरेच संतापले आहेत.

रणबीर कपूरच्या या व्हिडिओचे सत्य काय आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. काही युजर्स म्हणतात की, हा एक जाहिरात व्हिडिओ आहे. त्याचा पुढचा भाग अजून यायचा आहे. त्याचबरोबर काही यूजर्स नाराज होताना दिसत आहेत.

एका यूजर म्हणतो, 'व्हा अजून त्याचे चाहते.' दुसरा यूजर म्हणतो, 'कदाचित रणबीर त्याच्या चाहत्याला नवा फोन गिफ्ट करणार असेल.' तर दुसरा युजर म्हणतो, 'नेमकं काय झालं रणबीरला ?' आणखी काही यूजर्स म्हणतात की, 'रणबीर नक्कीच नाराज झाला असेल. म्हणूनच त्याने तसं कृत्य केलं.'

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो लवकरच श्रद्धा कपूरसोबत 'तू झूठी मैं मक्कर'या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रोमँटिक-कॉमेडी असा आशय असलेला चित्रपट आहे.

या चित्रपटातून श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार आहेत. रणबीर कपूर प्रदीर्घ काळानंतर एका रोमान्स-कॉमेडी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. हा चित्रपट 8 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT