Shamshera
Shamshera Saam Tv
मनोरंजन बातम्या

रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘शमशेरा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Shivani Tichkule

मुंबई - रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आगामी 'शमशेरा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज आहे. नुकताच या बहुचर्चित ‘शमशेरा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २४ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या आणि लूकमध्ये दिसणार आहे. काही तासांमध्येच हा टीझर हजारो लोकांनी पाहिला. चित्रपटाचा टीझर पाहिला की रणबीरचा कधीही न पाहिलेला अवतार यामध्ये पाहायला मिळतो. हा नवा लूक पाहून रणबीरचं विशेष कौतुक चाहते करत आहेत. चित्रपटाचा टीझर खूपच दमदार आहे. हा टीझर शेअर करताना वाणी कपूरने 'शमशेरा'च्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली आहे.

या चित्रपटातून रणबीर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या एका व्यक्तीरेखेचे नाव शमशेरा तर दुसऱ्या व्यक्तीरेखेचं नाव बल्ली असे असणार आहे. या टीझरमध्ये अभिनेता संजय दत्तचा देखील धमाकेदार अवतार पाहायला मिळत आहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूरने खूप मेहनत घेतली आहे.

'शमशेरा' चित्रपटाचा ट्रेलर २४ जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे. रणबीरसोबत या चित्रपटात वाणी कपूर, संजय दत्त, आशुतोष राणा, रोनित रॉय आणि सौरभ शुक्ला हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तब्बल १५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट येत्या २४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT