Ranbir Kapoor Buys Top Model Of Range Rover Saam TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor New Car: रणबीर कपूरने खरेदी केली अलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Ranbir Kapoor Expensive Car: रणबीर कपूरने नवीन आलिशान कार खरेदी केली आहे.

Pooja Dange

Ranbir Kapoor New Range Rover SUV:

रणबीर कपूर आणि आलिया भट ही बी टाऊनमधील बेस्ट जोडी आहे. दोन्ही कलाकार त्यांचा कामांसह त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात. गेल्या वर्षी आलिया, रणबीरने बॉक्स ऑफिसवर 'ब्रह्मास्त्र' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. ब्रह्मास्त्रनंतर आलिया अनेक चित्रपटांमध्ये दिसली. तर रणवीरचा आगामी चित्रपट अॅनिमल'ची सर्वांनाच उत्सुकता आहे.

आता रणबीर आणखी एका कारणाने चर्चेत आहे. रणबीरच्या कार कलेक्शनमध्ये भर झाली असून त्याने नवीन रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे. या कारचीही चर्चा आहे कारण कारची किंमत चक्रावून टाकणार आहे.

रणबीर कपूरने किती कोटींना नवी एसयूव्ही खरेदी केली?

रणबीर कपूरला रेंज रोव्हर कंपनीच्या लक्झरी कारचा शौक आहे. त्याच्याकडे या कंपनीच्या अनेक महागड्या गाड्या आहेत. आता रणबीरने त्याच्या आवडत्या कार कंपनीची आणखी एक नवीन एसयूव्ही खरेदी केली आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या नवीन रेंज रोव्हरसोबत दिसत आहे.

गाडीच्या बोनेटला एक फुलांचा हार घातलेला आहे, ज्यामुळे त्याने ही गाडी नुकतीच घेतली आहे, याचा पुरावा आहे. या अभिनेत्याची कार रेंज रोव्हरच्या एसई व्हेरियंटची प्रीमियम एसयूव्ही कार आहे. अ‍ॅनिमल अ‍ॅक्टर्सची कार व्हॉटल ग्रीन कलरची असून खूपच आकर्षक दिसत आहे. (Latest Entertainment News)

कारची किंमती

या कारच्या मॉडेलची किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे. याआधी रणबीरने रेंज रोव्हरची वोग आणि रेंज रोव्हर वेलार यांसारख्या आलिशान कार करोडो रुपयांना घेतल्या आहेत. सोशल मीडियावर सर्व चाहते रणबीर कपूरचे या नवीन कारसाठी अभिनंदन करत आहेत.

'अ‍ॅनिमल'मध्ये दिसणार रणबीरची डॅशिंग स्टाईल

'ब्रह्मास्त्र'च्या यशानंतर रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या आगामी चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्याचा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु 'गदर 2' मुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलावी लागली. आता मात्र रणबीरचा अॅनिमल 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT