Ramayana Yash Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ramayana Yash Look: ३३ किलोचे कपडे, १.८ किलोचा मुकुट; 'रामायण'मध्ये असा साकारला यशचा रावण लूक!

Ramayana Yash Look: रामायण चित्रपटात रावण साकारण्यासाठी यशने ३३ किलो वजनाचे कपडे परिधान केले होते. त्याच्या मुकुटाचे वजनही १.८ किलो होते. कॉस्च्युम डिझायनरने केला मोठा खुलासा.

Shruti Vilas Kadam

Ramayana Yash Look: सध्या 'रामायण' चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील कलाकारांचे लूक, भव्य सेट आणि वेशभूषा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेषतः रावणाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता यश याच्या लूकची जोरदार चर्चा आहे. मात्र, पडद्यावर रावण साकारण्यासाठी यशला किती मेहनत घ्यावी लागली, याचा खुलासा करण्यात आला आहे. चित्रपटाच्या कॉस्च्युम डिझायनर सानिया सरढरिया यांनी यशच्या वेशभूषेबाबत काही रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. रावणाच्या भूमिकेसाठी यशला तब्बल १६ ते २० किलो वजनाचे कपडे आणि दागिने परिधान करावे लागत होते. काही खास प्रसंगांमध्ये त्याच्या वेशभूषेचे वजन ३० ते ३३ किलो होते.

रावणाच्या वेशभूषेचे वजन ३३ किलोपर्यंत!

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत कॉस्च्युम डिझायनर सानिया सरढरिया यांनी यशच्या वेशभूषेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रावणाच्या बहुतांश पोशाखांचे वजन दागिन्यांसह १६ ते २० किलो होते. मात्र, लंकेतील रावणाचा लूक, त्याचा लग्नातील पोशाख आणि शूर्पणखेच्या लग्नाच्या प्रसंगातील पोशाख यांचे वजन तब्बल ३० ते ३३ किलो होते. एवढे जड कपडे परिधान करून शूटिंग करणे यशसाठी मोठे आव्हान होते.

यशच्या मुकुटाचे वजनही होते १.८ किलो!

रावणाच्या वेशभूषेतील सर्वात कठीण भाग म्हणजे त्याचा मुकुट तयार करणे. सानिया यांनी सांगितले की, मुकुटाचे वजन कमी करण्यासाठी टीमने अनेक प्रयोग केले. त्यासाठी मुकुटाचे अनेक थ्रीडी मॉडेल्स तयार करण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही मुकुटाचे वजन १.८ किलोपेक्षा कमी करता आले नाही. डोक्यावर एवढे वजन घेऊन दीर्घकाळ शूटिंग करणे खूप कठीण होते.

जड कपड्यांमध्ये चालणेही झाले होते कठीण

यशला या जड वेशभूषेमुळे हालचाल करणे आणि चालणेही कठीण जात होते. तरीही त्याने संपूर्ण शूटिंग अतिशय सहजतेने पूर्ण केले. सानिया यांच्या म्हणण्यानुसार, यश सेटवर नेहमी आनंदी असायचा. आपल्या जड वेशभूषेतील टोकदार भागांचा वापर करून तो सेटवरील इतर कलाकार आणि टीममधील सदस्यांची मजेशीर थट्टाही करायचा. त्यामुळे कठीण परिस्थितीतही तो सेटवरील वातावरण आनंदी ठेवत असे.

'रामायण'मध्ये दिसणार कलाकार

नितीश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे. नमित मल्होत्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. विशेष म्हणजे, या भव्य चित्रपटाला ए. आर. रहमान आणि हॅन्स झिमर यांनी संगीत दिले आहे. दोन भागांत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात ६६० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. तर दुसरा भाग २०२८ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lemon Water Vs Ginger Water: लिंबू की आल्याचे पाणी, वजन कमी करण्यासाठी काय प्यावे?

Maharashtra News Live Update: शिवसेना नेते मुकेश जिवतोडे पोलिसांच्या ताब्यात

CO, BDO सह १५ सरकारी अधिकारी तडकाफडकी सस्पेंड; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ

महाकाय अजगरावर मुलांची घसरगुंडी! थरारक VIDEO पाहाच

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या २ सामन्यांत पूर्णपणे बदलणार टीम इंडिया; नव्या कर्णधार-उपकर्णधारासह मैदानात उतरणार

SCROLL FOR NEXT