Ram Aayenge Song Sing By Swati Mishra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swati Mishra: 'राम आयेंगे' गाण्याने प्रेक्षकांना लावलंय वेड, हे गाणं गाणारी गायिका स्वाती मिश्रा आहे तरी कोण?

Ram Aayenge Song Sing By Swati Mishra: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हे गाणं खूप आवडलं आहे. त्यांनी देखील या गाण्याचे कौतुक केले आहे. हे गाणं गायलेली गायिका स्वाती मिश्राच्या आवाजाचे पीएम मोदींनी कौतुक केले आहे.

Priya More

Ram Mandir Pran Pratishtha Ceremony:

अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir Pran Pratisha Ceremony) आज होणार आहे. फक्त अयोध्याच नाही तर संपूर्ण देश राममय झाला आहे. सगळ्यांचे लक्ष राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागले आहे. सध्या संपूर्ण देशभरामध्ये श्रीरामाची गाणी वाजत आहेत. सगळ्यांच्या ओठावर सध्या एक गाणं आहे ते म्हणजे 'राम आयेंगे'. या गाण्याने सर्वांना वेड लावले आहे. सध्या सोशल मीडियावर देखील अनेक जण या गाण्यावर रील्स तयार करताना दिसत आहेत. सध्या हे गाणं सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. हे गाणं गात भक्त रामभक्तीत तल्लीन झाले आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हे गाणं खूप आवडलं आहे. त्यांनी देखील या गाण्याचे कौतुक केले आहे. हे गाणं गायलेली गायिका स्वाती मिश्राच्या आवाजाचे पीएम मोदींनी कौतुक केले आहे. हे गाणं ऐकून पीएम मोदीही मंत्रमुग्ध झाले आहेत. मधुर आवाजामध्ये गाणं गाणारी ही गायिका स्वाती मिश्रा आहे तरी कोण हे आज आपण जाणून घेणार आहोत...

'राम आयेंगे' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रत्येकजण हे गाणं ऐकताना दिसत आहेत. पीएम मोदींनी देखील सोशल मीडियावर हे गाणं शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. या गाण्याची यूट्यूब लिंक त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये शेअर केली. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'श्रीराम यांच्या स्वागतातील स्वाती मिश्राजी यांचे हे भजन मंत्रमुग्ध करणारे आहे'. तसंच, पीएम मोदींनी राम परत येत असल्याने 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

स्वाती मिश्रा यांनी 'राम आयेंगे' हे गाणे गायले आहे. या गाण्याच्या माध्यमातून स्वाती यांना चांगली पसंती मिळत आहे. त्यांना चांगली प्रसिद्धी देखील मिळाली आहे. ‘मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे आंगना सजाऊंगी’ या भजनाचे सगळेच चाहते झाले आहेत. स्वाती मिश्रा या मूळच्या बिहारच्या रहिवासी आहेत.

स्वाती बिहारमधील छपराच्या माला या गावातून आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, त्या मुंबईत राहतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक भजन गाणी गायली आहेत. चाहत्यांनाही स्वातीची गाणी खूप आवडतात आणि ती हळूहळू लोकप्रिय होत आहे. सोशल मीडियावरही तिला फॉलो केले जाते. स्वाती यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT