Ram Charan - Upasana's Wildlife-Themed Nursery : राम चरण आणि उपासना यांनी या वर्षी 20 जून रोजी मुलीला जन्म दिला. लग्नाच्या 11 वर्षानंतर त्यांनी कलिन कारा कोनिडेलाचे स्वागत केले. राम चरण आणि उपासना मुलीला सगळं बेस्ट मिळत आहे ना हे सुनिश्चित करत आहे.
उपासना सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळाचे अपडेट शेअर करत आहे. तिने आता त्यांच्या घरातील कलिनच्या नर्सरीची एक झलक शेअर केली आहे. कलिनची खोली जंगल या थीमवर डिझाइन केली गेली आहे.
राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या मुलीसाठी जंगल -थीम असलेली नर्सरी डिझाइन केली आहे आणि ती खोली सुंदर आणि परिपूर्ण आहे. (Latest Entertainment News)
नर्सरी रूमचा रंग पांढरी आणि राखाडी आहे, भिंतीवर जंगल, प्राण्यांची चित्रे आहेत. खोलीतील फर्निचर सोफे, कपाटे, साइड टेबल आणि कपाटांसह सर्व पांढर्या रंगाचे आहे. त्यांनी खोलीत प्राणांच्या आकाराचे सॉफ्ट टॉयज ठेवली आहेत.
वास्तुविशारद पवित्रा राजाराम यांनी खास खोलीची रचना केली आहे. नर्सरी रूममुळे राम चरण आणि उपासना यांच्या जंगलावरील प्रेमा उघड होत आहे. या जोडप्याला जंगले आणि प्राणी आवडतात. खरं तर, त्यांनी त्यांची शेवटची सुट्टी आफ्रिकेत घालवली होती.
जिथे त्यांनी त्यांच्या मुलीचे स्वागत करण्यापूर्वी काही महिने जंगली प्राणी पाहिले होते. उपासनाने एक वाघ दत्तक घेतला आहे. राम चरण आणि उपासना यांच्याकडे पाळीव प्राणी म्हणून कुत्रे आणि घोडे देखील आहेत.
त्यांच्या मुलीच्या थीमबद्दल बोलताना वास्तुविशारद पवित्रा राजाराम सांगितले की, "बाळ निसर्गाच्या सानिध्यात राहील पाहिजे अशी कल्पना होती.
जेणेकरून बाळ बाहेरून ऐकत असलेले पक्ष्यांचे गाणे वॉलपेपरमधील सुंदर पक्ष्यांसह आतून प्रतिबिंबित होईल. आम्ही वॉलपेपर तयार करण्यासाठी वापरलेला जंगलाचा विविध गोष्टींचा वापर केला आहे."
राम चरण आणि उपासना यांचे बाळ
20 जून रोजी राम चरण आणि उपासना यांना मुलगी झाली. या जोडप्याने पारंपरिक पद्धतीने बारश्याच्या आयोजन केले आणि बाळाचे नाव कलिन कारा कोनिडेला असे घोषित केले.
या नावाचा अर्थ परिवर्तनकारी आणि शुद्ध करणारी उर्जा असा आहे. आध्यात्मिक बदल घडवून आणते. त्यांच्या मुलीने त्यांच्या आजी-आजोबांच्या प्रेमात वाढावे अशी त्यांची इच्छा असल्याने हे जोडपे चिरंजीवीच्या घरी राहत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.