sara ali khan raksha bandhan sara ali khan
मनोरंजन बातम्या

Raksha Bandhan 2024 : पटौदी कुटुंबाचे नवाबी सेलिब्रेशन, सारा अली खानने तैमुर, जेह यांना बांधली राखी! PHOTOS

sara ali khan raksha bandhan : आज देशबरात रक्षाबंधनाचा हा सण साजरा होतोय. त्यामध्ये पटौदी कुटुंबीय ही मागे नाहीत. सारा अली खान रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Jyoti Shinde

Raksha Bandhan 2024 : बहीण-भावाचं नातं अतूट रहावं म्हणून दरवर्षी बहीण भावाला रक्षाबंधनाच्या सणाला ओवाळणी करून राखी बांधते. कितीही वाद-विवाद, भांडण असले तरी रक्षाबंधनाच्या दिवशी सगळं काही विसरून बहीण-भाऊ एकत्रित येतात अन् हा सण मोठया उत्साहात साजरा करतात. आज देशबरात रक्षाबंधनाचा हा सण साजरा होतोय. त्यामध्ये पटौदी कुटुंबीय ही मागे नाहीत. सारा अली खानने रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यांच्या नवाबी सेलिब्रेशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

रक्षाबंधन सेलिब्रेशन फोटो, नवाबी सेलिब्रेशन

नुकताच अभिनेत्री सारा अली खानने रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत . या फोटोमध्ये सारा अली खान सैफ अली खानच्या घरी दिसत आहे. सारा फोटोमध्ये पिवळ्या रंगाच्या ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली. तिच्या सिंपल आणि सुंदर लूकने लक्ष वेधून घेतलं.

sara ali khan raksha bandhan 2024

एका फोटोमध्ये सारा अली खान तिचा भाऊ इब्राहीमला टिळा लावताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये आपल्या भाऊरायाला ओवाळणी करून राखी बांधताना दिसत आहे.

sara ali khan raksha bandhan 2024

साराने आपल्या छोट्या भावालाही राखी बांधली. त्या फोटोमध्ये अभिनेत्री करिना कपूरपण दिसून आली. यावेळी अभिनेत्री करीना कपूरच्या मांडीवर जेह बसलेला आहे. सारा अली खानने छोट्या भाऊराया जेहला देखील राखी बांधली.

sara ali khan raksha bandhan 2024

रक्षाबंधन सेलिब्रेशन दरम्यान सैफ अली खान पण दिसून आला. रक्षाबंधनाच्या सेलिब्रेशननंतर फॅमिली फोटो तो बनता है.. मग काय सारा अली खान, सैफ अली खान, करीना कपूर यांचा फॅमिली फोटो काढण्यात आला. हा फोटो सारा अली खानने शेअर केला आहे. नवाबी सेलिब्रेशनची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

sara ali khan raksha bandhan 2024

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT