Rakhi Sawant And Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: सलमानला मिळालेल्या धमकीवर राखीची प्रतिक्रिया, ‘सलमान भाईच्या शत्रूंचे डोळे...’ म्हणत केली टीका

राखी सावंत सध्या सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर प्रतिक्रिया देत आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant And Salman Khan: राखी सावंतचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राखी सावंत सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर प्रतिक्रिया देत आहे. त्या व्हिडीओत राखी सावंत म्हणते, “सलमान खान एक दिग्गज सेलिब्रिटी आहे, त्याच्याबद्दल कोणीही असा वाईट विचार करू नये.”

सलमान खानच्या विरोधात बोलणाऱ्यांना राखी सावंत म्हणते, “सलमान खान एक धार्मिक व्यक्ती आहे. गोरगरिबांना मदत करणारा तो महापुरुष आहे. सलमानसाठी प्रार्थना करा. तो लोकांसाठी खूप काही उत्कृष्ट काम करतो. अंबानीपेक्षा तो किती श्रीमंत आहे माहीत आहे का? सलमान भाईच्या शत्रूंचे डोळे फुटू दे. त्यांची स्मृती संपुष्टात येवो. मी सलमान भाईसाठी प्रार्थना करते, कोणीही त्याच्याबद्दल वाईट विचार करू नये.”

सोबतच पुढे राखी म्हणते, “जे लोक सलमान भाईच्या विरोधात मुलाखती देत ​​आहेत, त्यांना मला सांगायचे आहे की, त्यांनी तुमचे काय केले आहे. हात धुवून तुम्ही माझ्या भावाच्या मागे का पडला आहात? तो खूप धार्मिक आहे, कृपया त्याला फॉलो करणं थांबवा. भाऊ खूप श्रीमंत आहे, तरीही तो वन बीएचकेमध्ये राहतो. तो नेहमीच लोकांसाठी खूप काही मदत करतो. त्याने माझ्या आईसाठी इतकं केलं आहे की, त्याचं ऋण फेडता येणार नाही.”

सलमान खानच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली होती. लॉरेन्स बिष्णोईने तुरुंगातून एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सलमानसाठी बरेच काही सांगितले होते. 'सलमान बिश्नोई समाजाने माफी मागावी', असे लॉरेन्सने म्हटले होते. यासोबतच लॉरेन्सने सलमान खानला स्पष्टपणे धमकी दिली होती. त्याचवेळी, यानंतर अभिनेत्याच्या टीमला धमकीचा ईमेलही आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT