मुंबई : बॉलिवूडची Bollywood ‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असणारी राखी सावंत Rakhi Sawant जेव्हा जेव्हा मीडिया फोटोग्राफर्सशी संवाद साधते. तेव्हा ती काहीतरी असे बोलते कि तो चर्चेचा विषय बनतो. आपल्या कामांसाठी जेव्हा राखी काही काळ घराबाहेर पडते, तेव्हा ती फोटोग्राफरशी नक्की संवाद साधते. सर्वांना मास्क लावण्यास सांगते आणि फोटोग्राफर्स कडून त्यांच्याकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे देते. Rakhi Sawant mentioned the name of the winner of Khatron Ke Khiladi by mistake
हे देखील पहा-
अलीकडेच असेच फोटोग्राफर्सशी संवाद साधत असताना राखीने बोलण्याच्या ओघात असे म्हटले की, ‘खतरों के खिलाडी’चे चाहते आनंदी झाले आहेत.
वास्तविक, वृत्तानुसार एका छायाचित्रकाराने राखीला सांगितले की, ‘खतरों के खिलाडी’चे स्पर्धक केपटाऊनमधून Capetown भारतात परत आले आहेत. यावर ती म्हणाली की, भारतात सर्वांचे स्वागत आहे. राहुल वैद्य, श्वेता तिवारी, यांचे स्वागत… जेव्हा पापाराजीने अर्जुन बिजलानीचे Arjun Bijlani नाव घेतले तेव्हा राखी म्हणाली- "अर्जुन बिजलानी जिंकला, नाही का ? होय, तोच जिंकला आहे.
पण आता खरंच अर्जुन विजेता झाला आहे की नाही, हे येत्या काही काळात पाहायला मिळेल. नंतर राखीने सांगितले की, ती कधीच केपटाऊनला गेली नव्हती. त्यानंतर तिने फोटोग्राफर्सबरोबर आणखी गप्पा मारल्या.
अर्जुन बिजलानी याआधी अनेक टीव्ही शोज मध्ये झळकला आहे. इश्क मे मरजावा, नागिन अश्या त्याच्या सिरीयल हिट झाल्या आहेत.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.