Rakhi Sawant Latest News Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant And Bigg Boss: ड्रामा क्वीन राखी सावंतची एक्झिट, जाणून घेऊया का होते चर्चा?

राखी सावंतने घेतली टॉप 5 मधून पहिली एक्झिट.

Pooja Dange

Bigg Boss Marathi 4 Rakhi Sawant Exit: ‘बिग बॉस मराठी ४’ ची सुरुवात जितकी धमकेदार झाली तितकाच धमकेदार शेवट आज होणार आहे. बिग बॉसचा आज महाअंतिम सोहळा आहे. या घरात मनोरंजनाची काहीच कमी नव्हती. परंतु राखी सावंतने या पर्वामध्ये एन्ट्री घेऊन सर्वांच्या नाकी नऊ आणले.

राखी सावंत म्हणजे एन्टरटेन्मेंटचा डबल डोस ती कधी काय करेल याचा नेम नाही. तसंच काहीसा गेम राखी मराठी बिग बॉसमध्ये देखील दाखवला. तिच्या वागण्याचा जितका स्पर्धकांना त्रास झाला तितकेच तिने प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केले. पण या एन्टरटेन्मेंट क्वीनचा प्रवास कसं होता ते पाहूया.

राखी सावंतने बिग बॉसच्या घरात खुप उशिरा एन्ट्री घेतली. पण तिची ही एक नारी सगळ्यांना भारी पडली. राखी मराठी बिग बॉसच्या आधी अनेक वेगवेगळ्या भाषेतील बिग बॉसमध्ये दिसली आहे. राखीची बद्दल सांगायचे तर ती या सगळ्या बिग बॉसमध्ये टॉप 5 पर्यंत गेली आहे. हिंदी बिग बॉसमध्ये राखी पहिल्यांदा सहभागी झाली होती.

राखी 2006मध्ये निवडणूक सुद्धा लढवली होती. तिने स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. रखीच्या पक्षाचे चिन्ह मिरची होते. राखी सावंत ही निवडणूक हरली होती.

राखी सावंत बिग बॉस व्यतिरिक्त 'नच बलिये' या शोमध्ये देखील सहभागी झाली होती. तसेच राखी एनडीटीव्ही वाहिनीवरील 'राखी का स्वयंवर'मध्ये भाग घेतला होता आणि ती विवाहबांधानत देखील अडकली होती. राखी तिच्या डान्समुळे ती ओळखली जाऊ लागली.

राखी नेहमीच चर्चेत असते. तिची विधाने नेहमीच अनेकांचे तिची दाखल घ्यायला भाग पाडते. राखीच्या वैयक्तिक आयुष्याची नेहमीच चर्चा होते. म तिचे बॉयफ्रेंड असो किंवा लग्न.

राखी गेले काही दिवस बिग बॉसच्या मराठी सहभागी झाली होती. ती टॉप 5मध्ये होती. ती नुकतीच घरबाहेर गेली आहे. 9 लाख रुपयांची मोठी रक्कम घेऊन राखी बाहेर पडली आहे. आता घराबाहेर येऊन राखी कोणते रडे करणार आणि कोणत्या कारणाने चर्चेत येणार हे आपल्याला दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT