Raju Srivastav Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raju Srivastav : 'हमे तुमसे प्यार कितना', राजू श्रीवास्तव यांचा कुटुंबासोबतचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल

राजू श्रीवास्तव यांचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन आणि चित्रपट अभिनेते राजू श्रीवास्तव(Raju Srivastav) यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. १० ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील(Delhi) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी काल (बुधवार) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. आता राजू श्रीवास्तव यांचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये राजू फॅमिली फंक्शनमध्ये हसताना आणि गाताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांचा हा व्हिडिओ एम्समध्ये दाखल होण्याच्या १५ दिवसांपूर्वीचा आहे. त्यांची तब्येत बिघडण्याच्या १५ दिवस आधी ते लखनऊच्या राजाजीपुरम येथे त्यांच्या नातेवाईकाच्या घरी लग्न सोहळ्यासाठी गेले होते. यावेळी ते कुटुंबासोबत आनंद लुटताना दिसले. राजू श्रीवास्तव यांनी काही गाणीही गायली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

१० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव जिममध्ये वर्कआउट करत होते. त्यानंतर ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. १ महिन्याहून अधिक उपचारांनंतर काल त्यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये निधन झाले.

१९८० दशकाच्या उत्तरार्धापासून मनोरंजन विश्वात काम करत असलेले राजू श्रीवास्तव यांनी 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सत्रात भाग घेतला, नंतर २००५ मध्ये त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांनी 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'बॉम्बे टू गोवा' (रिमेक) आणि 'आमदनी अठन्नी खर्चा रुपैया' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. राजू 'बिग बॉस' सीझन ३ मध्येही सहभागी झाले होते. काही काळ समाजवादी पक्षाशी संबंधित राहिल्यानंतर राजू यांनी २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट; एक्स गर्लफ्रेंडवर २० हून अधिक वार, नंतर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

310 कोटींचा तोटा… एसटी तिकीट महागणार? महायुती सरकारने दिले संकेत|VIDEO

'त्याने सर्व निकष पूर्ण केलेत...'; १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात स्थान द्या, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

Maharashtra News Live Update: कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपये भाव द्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

Kidney Damage Symptoms: सकाळी उठल्यावर हे ५ बदल जाणवतायेत?किडनी खराब होण्याची ही आहेत गंभीर लक्षणं, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT