Raju Srivastava Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव २१ दिवसांपासून रुग्णालयात, नातेवाइकांनी दिली हेल्थ अपडेट

राजू श्रीवास्तव लवकरच शुद्धीवर येईल, असा विश्वास राजूचे कुटुंबीय आणि डॉक्टरांना आहे. परंतु, राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव(Raju Srivastava) गेल्या २१ दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात(AIMS Hospital) उपचार घेत आहे. राजू श्रीवास्तवची प्रकृती गेल्या ३ दिवसांपासून स्थिर असून, त्यात काहीही बदल झालेला नसला, तरी तो लवकरच शुद्धीवर येईल, असा विश्वास राजूचे कुटुंबीय आणि डॉक्टरांना आहे. परंतु, राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजूच्या श्रीवास्तवच्या जवळच्या नातेवाईकाने सांगितले की, त्याच्या प्रकृतीत पूर्वीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. परंतु तो अजूनही ४० टक्के ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे. गेल्या ३६ तासांपासून त्याच्या प्रकृतीत कोणताही फरक पडलेला नाही.

राजू श्रीवास्तवच्या शारीरिक हालचाली वाढल्या आहेत, पण तरीही तो शुद्धीवर आलेला नाही. मात्र, डॉक्टर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगत आहेत. राजूच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तवला दररोज द्रवस्वरुपात आहार दिला जात असून, त्याला नळीद्वारे दूध आण फळांचा रस दिला जात आहे.

१० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तवला जीममध्ये ट्रेलमिलवर चालताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर राजूला दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्समध्ये दाखल केल्यानंतर राजू श्रीवास्तवची अँजिओप्लास्टी करण्यात आली, मात्र त्यानंतरही त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. राजू श्रीवास्तवच्या मेंदूने काम करणे बंद केले असून, त्याला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तवच्या हातापायांची हालचाल झाली होती. परंतु अद्यापही राजू शुद्धीवर आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: अवनीत कौरचा 'बोले चूड़ियां' लूक तुम्ही खास सोहळ्यासाठी करु शकता कॉपी

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचं विसर्जन कधी होणार? मंडळाने वेळ सांगितली

Maharashtra Live News Update: : विरार पोलीस ठाण्याच्या गणरायाचा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न

Navratri Festival 2025: नवरात्र 2025 कधी आहे? तारीख, मुहूर्त आणि पूजा माहिती

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी डावललं, कोळी बांधवांचा आरोप; मंडळाकडून मोठं वक्तव्य, सांगितलं...

SCROLL FOR NEXT