Rajpal Yadav 
मनोरंजन बातम्या

Rajpal Yadav: राजपाल यादव पुन्हा तुरुंगात जाणार; चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा मोठा दणका

Rajpal Yadav: अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवत पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

Shruti Vilas Kadam

Rajpal Yadav: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी न्यायालयाने या प्रकरणातील त्याची शिक्षा कायम ठेवत त्याला दोषी ठरवले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना राजपाल यादवला पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे निर्देशही दिले आहेत. न्यायालयाने त्यांच्या वर्तनावरही ताशेरे ओढत ते 'संशयास्पद' असल्याचे निरीक्षण नोंदवले.

कोर्टने काय आदेश दिले?

मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल यादवने न्यायालयात वेळोवेळी बदललेली भूमिका आणि दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे उच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच्यावरील तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. यापूर्वी ते या प्रकरणात जामिनावर बाहेर होते.

संपूर्ण प्रकरण काय?

हे संपूर्ण प्रकरण २०१० सालातील आहे. राजपाल यादवने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेल्या 'अता पता लापता' या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर कर्जाची परतफेड करण्यात झालेल्या विलंबामुळे हा वाद न्यायालयात पोहोचला.

उच्च न्यायालयात अपील

एप्रिल २०१८ मध्ये मॅजिस्ट्रेट न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा यादवला दोषी ठरवत सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २०१९ मध्ये सत्र न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाविरोधात राजपाल यादवने दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

जून २०२४ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देत जवळपास ९ कोटी रुपयांच्या थकबाकीची परतफेड करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, न्यायालयाने नोंदवले की त्याने वारंवार दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे यावर्षी २ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्याला शरण येण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर राजपाल यादवने आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पण करण्यापूर्वी एका मुलाखतीत राजपाल यादव भावुक झाले होते. "माझ्याकडे पैसे नाहीत. आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही," असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांना दिल्लीतील तिहार कारागृहात पाठवण्यात आले होते. आता उच्च न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याने राजपाल यादव यांच्या अडचणी आणखी वाढल्या असून, या निर्णयाची बॉलिवूड वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT