Rajpal Yadav SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rajpal Yadav : नेपोटिझमवर राजपाल यादव स्पष्टच म्हणाला, "असं असतं तर अक्षय कुमार, शाहरुख खान..."

Rajpal Yadav Talk On Nepotism : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याने नेपोटिझमवर आपले स्पष्ट मत मांडले आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र नेपोटिझमची चर्चा पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण यावर आपले मत मांडताना दिसत आहेत. आता या मुद्द्यावर कॉमेडी किंग अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav ) याने देखील आपले मत मांडले आहे. तो नेमकं या बाबत काय म्हणाला, जाणून घेऊयात.

अलिकडेच झालेल्या मिडिया मुलाखतीत राजपाल यादव याने नेपोटिझमवर आपले मत मांडले. तो म्हणाला की, "प्रामाणिकपणे बोलायचे झाले तर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम नाही. कारण नेपोटिझम असते. तर शाहरुख खान बॉलिवूडचा किंग कसा? राजपाल यादव, परेश रावल, अनुपम खेर सर, अक्षय कुमार सर, अक्षय कुमार सर कसं असते. तसेच राजेश खन्ना आणि धर्मेंद्र सर बॉलिवूडमध्ये कसे असते?"

राजपाल यादव पुढे म्हणाला," मला माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी सिनेसृष्टीतील येण्यास सांगितले नाही. ही माझी इच्छा होती. मी माझ्या मुलांनाही सांगितले आहे की, कोणत्याही खेळ किंवा चित्रपटामुळे कोणाचे आयुष्य बनत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही या इंडस्ट्रीत काम करायला पुरेसे सक्षम असाल तरच तु्म्ही हे साध्य करू शकता. मी तुम्हाला पुढे जाण्यासाठी धक्का देऊ शकतो. पण पुढे तुम्हालाच त्याचा सामना करावा लागेल. माझे इंडस्ट्रीमध्ये २०० ओळखीचे लोक आहेत पण काहीही काम झाले नाही. "

शेवटी राजपाल यादव म्हणाला की, "मी 38 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. पण आजवर माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला इंडस्ट्रीमध्ये संधी मिळू शकली नाही. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की, बॉलिवूडमध्ये नेपोटिझम नाही.जर बॉलिवूडमध्ये काम मिळवायचे असेल तर प्रयत्न केले पाहिजे. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT