मनोरंजन बातम्या

रजनीकांत यांचा 'लाल सलाम', चित्रपटाच्या पोस्टरसह रिलीज डेट केली जाहीर

Pooja Dange

१४ ऑगस्ट २०२३ ला रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट 'प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची अजूनही चर्चा होत होती. 'जेलर' ओटीटीवर देखील प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाला आहे.

'जेलर'ची क्रेझ कमी होत नाही तोवर रजनीकांत यांच्या आगामी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. रजनीकांत याची मुलगी ऐश्वर्या दिग्दर्शित 'लाल सलाम' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

'लाल सलाम' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा नुकतीच केली आहे. हा चित्रपट जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. पोंगलच्या मुहूर्तावर 'लाल सलाम' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'लाल सलाम' या चित्रपटामध्ये रजनीकांत यांचा कॅमिओ असणार आहे. विष्णू विशाल आणि विक्रांत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. क्रिकेटर कपिल देव देखील यांचा देखील या चित्रपटामध्ये कॅमिओ असल्याचे बोलले जात आहे.

''लाल सलाम' २०२४ च्या पोंगलला मोठ्या पडद्यावर येणार आहे.' अशी पोस्ट चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे. लाल रंगाचा वापर या पोस्टवर करण्यात आला आहे. या पोस्टवर रजनीकांत यांचा जेलरमधील शेवटचा लूक दाखविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT