Riteish Deshmukh - Raja Shivaji  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh - Raja Shivaji : 'राजा शिवाजी' मध्ये सलमान खानची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रितेश देशमुखने सर्वकाही सांगितले

Riteish Deshmukh - Raja Shivaji - Salman Khan Entry : 'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड फिनालेला रितेश भाऊंनी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. सलमान खानच्या एन्ट्रीवर ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' चित्रपटाची टीम 'बिग बॉस मराठी ६' च्या मंचावर आली.

रितेश भाऊंनी चित्रपटातील सलमान खानच्या एन्ट्रीबाबत मोठे विधान केले.

'राजा शिवाजी'चा ट्रेलर आज लाँच होणार आहे.

'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड फिनाले १९ एप्रिलला थाटामाटात पार पडला. १०० दिवसांचा प्रवास अखेर संपला. मराठी अभिनेत्री तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'ची विजेता ठरली. तर टिव्हीचा प्रसिद्ध अभिनेता राकेश बापट उपविजेता ठरला. ग्रँड फिनालेला रितेश भाऊंचा आगामी चित्रपट 'राजा शिवाजी' ची टीम आली होती. त्यात रितेश भाऊंची बायको, बॉलिवूड अभिनेत्री आणि 'राजा शिवाजी' चित्रपटाची निर्माती जिनिलिया देशमुख आली. तसेच तिच्या सोबत बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन देखील आला.

बिग बॉसच्या मंचावर जिनिलिया आणि अभिषेकसोबत सर्वांनी गप्पा मारल्या. सदस्यांनी त्यांना प्रश्न केले. तसेच जिनिलिया आणि अभिषेकने स्पर्धकांना खूप शुभेच्छा देखील दिल्या. अभिषेकला 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल बोलताना भरून आले. तसेच त्यांनी रितेश देशमुखच्या कामाचे भरभरून कौतुक केले, जे ऐकून जिनिलियाच्या डोळ्यांतही पाणी आले. 'राजा शिवाजी' हा रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. रितेश अभिषेकला मोठा भाऊ मानतो.

रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड फिनालेमध्ये 'राजा शिवाजी' चित्रपटातील बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या एन्ट्रीबद्दल मोठे विधान केले. रितेश भाऊ म्हणाले की, "सलमान भाऊ सुद्धा सिनेमात आहे..." हे ऐकून प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला. मात्र अद्याप 'राजा शिवाजी' चित्रपटात सलमान खान कोणत्या भूमिकेत दिसणार हे स्पष्ट झाले नाही. आज (२० एप्रिल) ला 'राजा शिवाजी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा थाटामाटात पार पडणार आहे.

'राजा शिवाजी' चित्रपट कधी रिलीज होणार?

'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया आणि अभिषेक बच्चनसोबतच संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन हे दिग्गज कलाकार झळकले आहेत. चित्रपटात जिनिलीया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. महेश मांजरेकर शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारणार आहे. तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री दिसणार आहेत. अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल.'राजा शिवाजी' हा भव्य चित्रपट १ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

Accident News : भयंकर अपघात! ३१ मजुरांनी खचाखच भरलेला पिकअप महामार्गावर उलटला, ४ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update:विलास घुले खून प्रकरणी आज न्यायिक मागणीसाठी केजमध्ये निघणार मोर्चा

साताऱ्यातील प्रसिद्ध 5 धबधबे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT