Rahul Vaidya-Disha Parmar Instagram @dishaparmar
मनोरंजन बातम्या

Rahul Vaidya Baby Girl: राहुल वैद्यच्या वाढदिवशी लक्ष्मी आली घरी, बायकोने दिलं मोठं गिफ्ट...

Rahul Vaidya Birthday: दिशा आणि त्यांच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेतले.

Chetan Bodke

Disha Parmar and Rahul Vaidya

नुकतंच गणेश चतुर्थीच्या दिवशी गायक राहुल वैद्य (Singer Rahul Vaidya) आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार (Actress Disha Parmar) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. राहुल वैद्य बाबा झाला असून राहुलची पत्नी दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. चिमुकलीच्या रूपाने घरी लक्ष्मीचे आगमन झाल्यामुळे राहुल वैद्यच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. अशातच आज गायक राहुल वैद्यचा वाढदिवस असून त्याच्या वाढदिवशी त्याच्या पत्नीला आज डिस्चार्ज मिळाला आहे. दिशा आणि त्यांच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

रुग्णालयातून बाहेर पडताच राहुलने माध्यमांसोबत संवाद साधला, गणेश चतुर्थीच्या दिवशी आमच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या वाढदिवशी माझी मुलगी आणि पत्नी यांना डिस्चार्ज मिळाला आहे. यापेक्षा चांगलं वाढदिवसाचं गिफ्ट जगामध्ये क्वचितच लोकांना मिळू शकतं. मी देवाचेही आभार मानतो, तुम्ही सर्वांनी माझ्या मुलीला आशीर्वाद द्या.

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका गोंडस हत्तीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी मुलगी झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस चिमुकलीला २० सप्टेंबर रोजी जन्म दिला.

राहुल वैद्यने पोस्ट शेअर करत कॅप्शन दिले की, 'आम्हाला मुलगी झाली आहे. मम्मी आणि बाळ सुखरूप आहेत.' ही पोस्ट शेअर करत त्याने पत्नी दिशाच्या प्रसूतीसाठी मदत करणाऱ्या डॉक्टर आणि इतर सदस्यांचे आभार मानले आहे.

आज राहुल वैद्यच्या वाढदिवसानिमित्त पत्नी दिशा परमारने त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. दिशाने एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये राहुल आपल्या मुलीला मांडीवर घेऊन तिच्यासोबत खेळताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करण्यासोबत दिशाने लिहिले की, ‘हॅपी बर्थडे बिग बेबी, मम्मा आणि छोट्या बाळाकडून तुझ्यावर खूप प्रेम.’

अभिनेत्री दिशाला प्रसूतीच्या तिसऱ्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राहुलने चाहत्यांना एक अपडेट दिले आहे आणि सांगितले आहे की दिशा आणि त्याची मुलगी दोघेही पूर्णपणे सुखरूप आहेत.. अभिनेत्याच्या वाढदिवशीच त्यांच्या घरी चिमुकली येणार असल्यामुळे राहुलचा आनंद द्विगुणित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT