Salman Khan Rahul Roy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Helped Rahul Roy : देवासारखा धावून आला सलमान खान...आशिकी फेम राहुल रॉयचे वाचवले प्राण

Salman Khan Pays Rahul Roy Hospital Bill : सलमान खानने आशिकी फेम अभिनेता राहुल रॉयला त्याच्या वाईट काळात मदत केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rahul Roy Thanks Salman Khan : सलमान खानला बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखले जाते. सलमान खानने बॉलिवूडमध्ये तर आपलं नाव कमावलं आहे. खऱ्या आयुष्यातही सलमान खानने लोकांच्या मनात घर केलं आहे. सलमान खानने आशिकी फेम अभिनेता राहुल रॉयला त्याच्या वाईट काळात मदत केली आहे.

आशिकी फेम राहुल रॉयने प्रेक्षकांनी मने जिंकली होती. बऱ्याच काळापासून राहुल चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. काश्मीरमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याला ब्रेन स्ट्रोक आल्याने राहुलला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले. राहुल रॉयने दीड महिना हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्याच्या हॉस्पिटलचे बिल भरण्यात सलमान खानने त्याला मदत केली होती. (Latest Entertainment News In Marathi)

राहुलची बहीण प्रियांका रॉयने नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे. की,राहुल रॉयला डिस्चार्ज मिळाल्यानंतर हॉस्पिटलचे बिल भरण्यास सलमान खानने मदत केली होती. "मला सलमान खानचे आभार मानायचे आहेत कारण जे काही बिल राहिले होते ते त्याने फेब्रुवारीमध्ये भरुन टाकले." असं प्रियांका म्हणाली.

राहुलच्या एलओसी चित्रपटाच्या निर्मात्याने चित्रपटासाठी राहुलला जे मानधन दिले होते ते हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी पुरेसे नव्हते. त्याचदरम्यान, सलमान खानने राहुलला फोन करुन काही मदत हवी आहे का अशी विचारपूस केली. त्यानंतर सलमान खानने हॉस्पिटलचे उरलेलं बिल भरले.

"सलमान खानबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत.पण खऱ्या आयुष्यात तो देवमाणूस आहे" असं राहुल रॉय म्हणाला."सलमानबाबतची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सलमान कधीच याबाबत मीडियासमोर बोलला नाही. हे मला खूप आवडलं. तो खूप चांगला माणूस आहे. मी कोणालाही काहीही न सांगता सलमानने स्वतः हून मदतीचा हात पुढे केला. त्यामुळेच सलमान खऱ्या आयुष्यात स्टार आहे." असं राहुलची बहीण प्रियांका म्हणाली.

दरम्यान, राहुल आता तो पूर्णपणे बरा झाला असून कामाच्या शोधात आहे. 'राहुलने कामासाठी सलमान खानला फोन केला होता.तो लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईन.अशी अपेक्षा आहे.असं राहुलची बहिण म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT