Chandramukhi 2 Raghava Lawrence Look Reveal  Instagram @kanganaranaut
मनोरंजन बातम्या

Chandramukhi 2 Update : कंगना रनौतच्या 'चंद्रमुखी 2'विषयी मोठी अपडेट ; सुपरस्टार रजनीकांतला दाक्षिणात्य अभिनेत्याने केलं रिप्लेस

Kangana Ranaut Upcoming Movie : चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'चंद्रमुखी 2'मधील राघव लॉरेन्सचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे

Pooja Dange

Rajnikant Replace In Chandramukhi 2 : रजनीकांत आणि कंगना रनौत मुख्य भूमिकेत चंद्रमुखी २ हा चित्रपटाची आहे. साऊथचा सुप्रसिद्ध अभिनेता राघव लॉरेन्स देखील या चित्रपटामध्ये महत्तवाची भूमिका साकारणार आहे.या सर्व कलाकारांचे चाहते त्यांच्या या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटविषयीची मोठी अपडेट चित्रपटाच्या निर्णयांनी शेअर केली आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी चंद्रमुखी 2 मधील राघव लॉरेन्सचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. चित्रपटाचे पोस्टर आज म्हणजेच 31 जुलै रोजी सकाळी 10 वाजता रिलीज करण्यात आले आहे. रजनीकांत मुख्य भूमिकेत असलेल्या चंद्रमुखी या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा आगामी सिक्वेल आहे.

पहिल्या भागात रजनीकांतने साकारलेली वेट्टय्यान राजा या भूमिकेत तो दिसणार आहे. लॉरेन्सच्या राजेशाही लूकने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

पी वासू दिग्दर्शित, चित्रपटाने त्याचे शूट पूर्ण केले आहे आणि त्यात वाडीवेलू, राधिका सरथकुमार, लक्ष्मी मेनन आणि इतर महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी दिले आहे आणि चित्रपटाची निर्मिती लायका प्रॉडक्शनने केली आहे. हा चित्रपट गणेश चतुर्थीला म्हणजे १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटामध्ये कंगना रनौत देखील दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती कोणती भूमिका साकारते याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. कंगना अभिनयासह निर्मती आणि दिग्दर्शन या क्षेत्रात देखील कार्यरत आहे.

चंद्रमुखी या चित्रपटाचा बॉलिवूडमध्ये देखील रिमेक बनविण्यात आला आहे. चंद्रमुखीमध्ये अक्षय कुमारने मुख्य भुमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र हादरला! एकट्यात बसलेल्या मुलीवर वाकडी नजर; नराधमाकडून स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार

Maharashtra Live News Update: शरद पवार बारामतीत अॅक्शन मोडवर

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT