Mahira Khan 2nd Wedding Twitter
मनोरंजन बातम्या

Mahira Khan 2nd Wedding: प्रसिद्ध अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ! नवरीला पाहताच नवरदेव भावुक, Video व्हायरल

Mahira Khan Wedding Viral Video: प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने रविवारी बॉयफ्रेंडसोबत निकाह केला आहे.

Chetan Bodke

Mahira Khan 2nd Wedding

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच अभिनेत्रीने रविवारी बॉयफ्रेंड सलीम करीमसोबत निकाह केला आहे. ‘रईस’ चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉयफ्रेंड सलीम आणि माहिराने एकमेकांना जवळपास ५ वर्ष एकत्र डेट केलं होतं. दरम्यान, एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी आता निकाह करण्याचा निर्णय घेतला आहे.

माहिरा आणि सलीमचा नुकताच रविवारी पाकिस्तानामध्ये शाही पद्धतीने निकाह पार पाडला. सध्या त्यांच्या निकाहचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर) वर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या निकाहचा पहिला व्हिडीओ अभिनेत्रीचा मॅनेजर अनुशय तलहा खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या त्यांच्या निकाहचे व्हिडीओपाहून नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये, माहिराने निकाहमध्ये पेस्टल रंगाचा घागरा घातलेला असून तिने ओढणीने आपला चेहरा झाकून घेतला आहे. अभिनेत्रीच्या ह्या क्यूट लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर सलीमने काळ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर निळ्या रंगाची पगडी परिधान केली होती. दोघांच्याही जोडीची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. सध्या त्यांच्या निकाहमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या जोडप्यांचे चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

माहिरा पेशाने अभिनेत्री असून, सलीम करीम पेशाने बिझनेसमन आहे. यावेळी त्यांच्या निकाहसाठी, दोघांचेही कुटुंबीय, त्यांचा मित्र परिवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा अगदी थाटामाटात पार पडला.

माहिराच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर, सलीम करीमसोबत माहिराचे दुसरे लग्न आहे. माहिराने पहिलं लग्न अली अक्सरसोबत २००७ मध्ये केलं होतं. त्या दोघांचीही भेट लॉस एंजेलिसमध्ये झाली होती. अली अक्सरी हा पेशाने अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. माहिराला अली अक्सरपासून अलझान नावाचा मुलगा आहे. पण २०१५ मध्ये दोघांनीही एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. मुलगा अलझानचा सांभाळ माहिराच करतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT