R Madhavan Answer on son entering in Bollywood
R Madhavan Answer on son entering in Bollywood  Saam TV
मनोरंजन बातम्या

R Madhavan's Spoke About Son's Debut: तुझा मुलगाही आता अभिनेता होणार? प्रश्नावर आर माधवनच्या उत्तराने जिंकलं मन

Pooja Dange

R Madhavan's Spoke About Vedant Debut In Bollywood: अभिनेता आर माधवनने बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटनमध्ये त्याच्या अभिनयाची छाप पडली आहे. आर माधवन स्वतःच्या कामाव्यतिरिक्त मुलाच्या यशामुळे देखील चर्चेत असतो. आर माधवांचा मुलगा वेदांत जलतरणपटू आहे. वेदांत जलतरण स्पर्धेत कौशल्य दाखवून यश संपादन करत असतो.

आर माधवनला त्याच्या मुलाच्या यशाचे कौतुक आहे. आर माधवन मुलाचे यश सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. तो एक प्राउड फादर आहे. परंतु अभिनेत्याने अलीकडेच वेदांतच्या चित्रपटामध्ये पदार्पण केल्यास त्याला कसे वाटेल याबद्दल खुलासा केला.

आपल्या अभिनयाने लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा आर माधवनचा मुलगा वेदांत खेळात सतत उत्तम कामगिरी करत आहे. इतकंच नाही तर तो अनेकदा त्याच्या वडिलांना तसेच भारतीयांना अभिमान अशी कामगिरी करत असतो.

या सगळ्यात माधवनला त्याच्या मुलाच्या चित्रपटातील पदार्पणाविषयी विचारण्यात येते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आर माधवन याविषयी मनमोकळेपणे व्यक्त झाला आहे. तो म्हणाला की, जर त्याला चित्रपटसृष्टीत यायचे असेल तर तो त्याला मेह्निच पाठिंबा देईल.

एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत आर माधवनला विचारण्यात आले की, माधवन तू स्वत: दोन दशकांहून अधिक काळ काम करत असलेल्या इंडस्ट्रीत तुझ्या मुलाला येण्यास इच्छुक आहेस का?

यावर प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणाला, 'मला चित्रपटसृष्टी आवडते. शो बिझनेससारखा कोणताही व्यवसाय नाही. माझ्या मुलाला कोणत्याही वेळी यात यायचे असेल तर मी त्याला कधीही रोखणार नाही.

मी फक्त त्याला हे सांगू इच्छितो की हे एक अतिशय आव्हानात्मक क्षेत्र आहे. त्याला जे काही करायचे आहे ते करण्यापासून मी त्याला कधीही रोखणार नाही. जर त्याला चित्रपटसृष्टीत यायचे असेल तर ती त्याची निवड आहे. मी त्याला मदत करेन कारण ते माझ्या मुलाचे स्वप्न असेल.

आर माधवन मुलगा वेदांतविषयी बोलताना म्हणाला, स्विमिंग त्याला मनापासून आवडते आणि एक वडील म्हणून तो त्याच्या मुलाच्या स्वप्नांना पूर्ण पाठिंबा देत आहे. अभिनेता म्हणाला, 'वडील म्हणून मी भूतकाळातील काही सुज्ञ पालकांना त्यांनी चांगल्या मुलांचे संगोपन कसे केले याबद्दल बोलताना ऐकले आहे.

ते म्हणाले, तुमच्या मुलाला मोकळा वेळ देऊ नका, त्यांचा संपूर्ण दिवसाचे नियोजन आहे का याची खात्री करा, मुलं चार वर्षाची झाल्यापासून ते 14 वर्षाची होईपर्यंत सर्व काही वेळेवर केले पाहिजे. मला खूप आनंद झाला आहे की वेदांत त्याचे स्वप्न जगत आहे, त्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. (Latest Entertainment News)

ऑलिम्पिक स्थर खूप उच्च आहे. त्यामुळे त्याला खूप मेहनत करावी लागते. माझी ओळख वेदांतच्या वाट्याला येऊ शकते, म्हणून आम्ही त्याला या सगळ्या प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू.

आर माधवन यांचा मुलगा वेदांत हा जलतरणपटू आहे आणि त्याने अलीकडेच जलतरण स्पर्धेत भारतासाठी पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. इतकेच नाही तर गेल्या काही वर्षांत वेदांत माधवनने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विजयांची नोंद केली आहे.

आर माधवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याने गेल्या वर्षी 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' मधून दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अभिनेत्यानेही काम केले आहे. हा चित्रपट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात धंगेकरानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

Amla Benefits: मधुमेहींसाठी आवळा ठरेल रामबाण उपाय; फायदे एकदा वाचा

Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा

Amravati: गढूळ पाण्यावरुन वडनेर गंगाई ग्रामस्थांचा दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर राेष, उपविभागीय अभियंत्यांना दिला इशारा

Uddhav Thackeray : भाजप आरएसएसवर बंदी आणेल; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर बाण

SCROLL FOR NEXT