PRODUCER RB CHOUDARY DEATH IN CAR ACCIDENT  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Accident News : सिनेसृष्टीवर शोककळा! सुप्रसिद्ध निर्माता आर.बी. चौधरी यांचे भीषण कार अपघातात निधन

Producer RB Choudary Dies Accident : मनोरंजन सृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध निर्माता आर. बी. चौधरी यांचे भीषण कार अपघातात निधन झाले आहे. या घटनेने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

  • ५ मे रोजी दोन कलाकारांचा अपघाती मृत्यू

  • निर्माता आर. बी. चौधरी यांचा उदयपूरमध्ये कार अपघात

  • मल्याळम अभिनेते संतोष नायर यांचा सकाळी मृत्यू

  • संपूर्ण सिनेइंडस्ट्रीवर शोककळा

Producer RB Choudary Dies In Road Accident मनोरंजन सृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. एकाच दिवशी इंडस्ट्रीने दोन कलाकार गमावले. मंगळवारी ५ मे रोजी दुपारच्या सुमारास एका भीषण अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्माता आर. बी. चौधरी यांच निधन झालं. दरम्यान त्याच दिवशी सकाळच्या सुमारास मल्याळम अभिनेते संतोष नायर (Santosh Naiar Death Accident ) यांचा देखील अपघाती मृत्यू झाला. या दोन वेगवेगळ्या घडलेल्या घटनांनी मनोरंजन सृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर. बी. चौधरी हे उदयपूर येथे प्रवास करत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांची गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली असून अपघाताची तीव्रता पाहता हा धक्का अधिकच मोठा असल्याचं स्पष्ट होतं. या घटनेमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आर. बी. चौधरी हे अत्यंत मानाचे नाव होते. तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये १०० हून अधिक सिनेमांची निर्मिती त्यांनी केली. तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमधील त्यांच्या योगदानामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ते लोकप्रिय तमिळ अभिनेता जीवा यांचे वडील होते.

१९८८ साली त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांचा पहिला चित्रपट Pudhu Vasantham हा ठरला, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यासाठी त्यांना तमिळनाडू राज्य पुरस्कारही मिळाला. त्यांनी अनेक नवोदित कलाकार आणि दिग्दर्शकांना संधी दिली. विशेषतः दिग्दर्शक के. एस. रविकुमार यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांचा शेवटचा चित्रपट ‘Marisan’ जुलै २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यात फहाद फासिल यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘Love Today’, ‘Jolly’, ‘Mr. Romeo’ आणि ‘ACP Shiva’ हे त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी काही होते.

आर. बी. चौधरी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीने एक दूरदृष्टीचा निर्माता गमावला आहे. ६ मे रोजी त्यांचे पार्थिव चेन्नई येथे नेण्यात येणार असून तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा भावना सिनेसृष्टीत व्यक्त केल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

D. Y Patil Death: पद्मश्री डी. वाय पाटील यांचं निधन, शिक्षण अन् राजकीय वर्तुळात शोककळा

असली आणि नकली मंगळसूत्र कसे ओळखायचे?

Farmer Loan Waiver : 'या' ३०,५५५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही; कारण आलं समोर

Revised ITR: ITR भरताना चूक झाली? 31 जुलैनंतरही करता येणार दुरुस्ती; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Maharashtra News Live Update: दुचाकी वाहन चोरणाऱ्या आरोपींना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT