Nishi Singh Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nishi Singh Passed Away: ‘तेनाली रामा’ तील कलाकाराचं झालं निधन; मनाेरंजनसृष्टीवर शाेककळा

वयाच्या ५० वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

Shivani Tichkule

मुंबई - छोट्या पडद्यावरील अभिनेत्री (Actress) निशी सिंह (Nishi Singh) यांचे निधन झाले आहे. निशी सिंह यांनी 'हिटलर दीदी’, ‘कुबूल है’, ‘इश्कबाज’ आणि ‘तेनाली रामा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. निशी सिंह गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. वयाच्या ५० वर्षी त्यांची अखेरचा श्वास घेतला. सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निशी सिंह भडाली यांच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. (Nishi Singh Passed Away)

दोन दिवसांपूर्वीच निशी यांनी 16 सप्टेंबरला त्यांचा 50 वां वाढदिवस साजरा केला होता. अभिनेत्री दीर्घकाळापासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ही खालवत गेली. त्यातच त्यांना घशाचा गंभीर संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवसांनी निशी यांची तब्येत पुन्हा बिघडली होती.

गेल्या आठ वर्षांपासून निशी सिंह मनोरंजनसृष्टीत काम करत आहेत. निशी सिंह यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. निशी सिंह यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, आणि दोन मुलं असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

आम्ही नाही आणली भाड्याची माणसं... शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची शेरोशायरी|VIDEO

Maharashtra Live News Update : शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची पुणे येथे जाहीर सभा

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

Gold vs Diamond Mangalsutra: कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र दिसेल अधिक रेखीव?

SCROLL FOR NEXT