Pushpa 2 Worldwide Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Worldwide Collection: पुष्पा भाऊचा स्वॅगच लय भारी! 1000 कोटींचा टप्पा पार

Pushpa 2 Box Office Collection Day 7 : 'पुष्पा 2'ची वाढती क्रेझ जगाला वेड लावत आहे. चित्रपटाने सात दिवसात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाचे कलेक्शन जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'पुष्पा 2: द रुल' ची (Pushpa 2 ) चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट दिवसेंदिवस बंपर कमाई करत आहे. चित्रपटाने सात दिवसात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची केमिस्ट्री चाहत्यांना भुरळ घालत आहे.

'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. यात पठाण, जवान, बाहुबली आणि ॲनिमल यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. हा चित्रपटाने वीकेंडला छप्परफाड कमाई केली होती. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने आता जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'पुष्पा 2' ऑफिस कलेक्शन दिवस 7

'पुष्पा 2' ने पहिल्या दिवशी 164.25 कोटी रुपये तर दुसऱ्या दिवशी 93.8 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या दिवशी 119.25 कोटींची कमाई झाली. या चित्रपटाने वीकेंडला तर धुमाकूळ घातला. चित्रपटाने चौथ्या दिवशी 141.5 कोटींची तगडी कमाई केली. चित्रपटाच्या पाचव्या दिवशी 'पुष्पा 2'ने 65.1 कोटी रुपये कमावले असून चित्रपटाच्या सहाव्या दिवशी (Pushpa 2 Box Office Collection Day 6) 52.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच पेड प्रिव्ह्यूजमध्ये 10.65 कोटी रुपये कमावले. मीडिया रिपोर्टनुसार,'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाने रिलीजच्या सातव्या दिवशी 42 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने 687.00 कोटी रुपये कमावले आहे.

'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने तेलगूमध्ये 232.75 कोटी रुपये, हिंदीमध्ये 398 कोटी रुपये, तामिळमध्ये 39 कोटी रुपये, कन्नडमध्ये 5.05 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 12.1 कोटी रुपये कमावले आहेत. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपट ॲक्शनचा धमाका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? काही ठळक मुद्द्यांवरून जाणून घ्या तथ्य

Crime : मी अजून सहन करु शकत नाही...; विद्यार्थिनीने वसतिगृहात स्वत:ला संपवलं, सुसाईट नोटमध्ये लिहिलं...

Solapur Crime: १० वर्षांच्या मुलाच्या अपहरण करून हत्या, कालव्यात आढळला मृतदेह; सोलापूर हादरले

Maharashtra Tourism: शांत वातावरण अन् सुंदर निसर्ग...; महाराष्ट्रातील 'या' ऐतिहासिक जिल्ह्याला एकदा तरी भेट द्याच

राज ठाकरे हे राजकीय कचराकुंडीत गेलेत; दुबेनंतर आता तिवारी बरळले| VIDEO

SCROLL FOR NEXT