Pushpa 2 Box Office Collection Day 13 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Collection : 'पुष्पा 2'ची बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई; 950 कोटींचा टप्पा पार, लवकरच मोडणार बाहुबलीचा रेकॉर्ड

Pushpa 2 Box Office Collection Day 13 : 'पुष्पा 2' च्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. हा चित्रपट आता लवकरच 'बाहुबली'चा रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाचे १३व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun ) 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने खूप कमी वेळात उंच शिखर गाठले आहे. 'पुष्पा 2' जबरदस्त ॲक्शनचा धमाका पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडत आहे. अल्लू अर्जुनच्या अटकेनंतरही 'पुष्पा २'च्या प्रेक्षकांमध्ये ७० टक्क्याने वाढ झाली आहे.

'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने एकाच आठवड्यात सिनेमाचे बजेट वसूल केले होते. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'चित्रपटाने जगभरात 1409 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये पाहायला मिळत आहे. यात तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला जगभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाचे १३व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 13

  • पहिला दिवस - 164.25 कोटी

  • दुसरा दिवस - 93.8 कोटी

  • तिसरा दिवस - 119.25 कोटी

  • चौथा दिवस - 141.5 कोटी

  • पाचवा दिवस - 65.1 कोटी

  • सहावा दिवस - 52.50 कोटी

  • सातवा दिवस - 42 कोटी

  • आठवा दिवस - 37.95 कोटी

  • नववा दिवस - 36.40 कोटी

  • दहावा दिवस - 62.3 कोटी

  • अकरावा दिवस - 75 कोटी

  • बारावा दिवस - 27.75 कोटी

  • तेरावा दिवस - 24.25 कोटी

  • पेड प्रिव्ह्यूज - 10.65 कोटी

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सर्व भाषांमध्ये मिळून 953.3 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने 13 दिवसांत तेलुगूमध्ये 290.9 कोटी रुपये, हिंदीमध्ये 591.1 कोटी रुपये, तामिळमध्ये 50.65 कोटी रुपये, कन्नडमध्ये 6.87 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 13.78 कोटी रुपये कमावले आहेत.

'पुष्पा 2' चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. 'पुष्पा 2' आता लवकरच 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडणार आहे. बाहुबली 2' चित्रपटाने जगभरात 1,810.60 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या पॅन इंडिया चित्रपटाच्या यादीत टॉप 5 मध्ये येतो. आता हा चित्रपट अजून किती रेकॉर्ड ब्रेक करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT