Guru Randhawa And Saiee Manjarekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kuch Khattaa Ho Jaye: गुरू रंधावाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'कुछ खट्टा हो जाये'मध्ये सई मांजरेकरसोबत करणार काम

Kuch Khattaa Ho Jaye Movie: गुरू रंधावा 'कुछ खट्टा हो जाये' (Kuch Khatta Ho jaye Movie) या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात करणार आहे. मराठमोळी अभिनेत्री सई मांजरेकरसोबत तो या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे.

Priya More

Guru Randhawa And Saiee Manjarekar:

पंजाबचा प्रसिद्ध गायक गुरु रंधावा (Guru Randhawa) लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आपल्या मधूर आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य करणारा गुरू आता अभिनयातून प्रेक्षकांचे मन जिंकणार आहे. लवकरच गुरू रंधावा बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री करणार आहे.

गुरू रंधावा 'कुछ खट्टा हो जाये' (Kuch Khatta Ho jaye Movie) या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात करणार आहे. मराठमोळी अभिनेत्री सई मांजरेकरसोबत तो या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर मंगळवारी म्हणजेच ३० जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे.

गुरू रंधावा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. नुकताच गुरूने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये गुरू रंधावा आणि सई मांजरेकरसोबत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर देखील काम करताना दिसणार आहेत.

गुरू आणि सईचा हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजन आहे. ज्यामध्ये अनुपम खेर आणि इला अरुण यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. 'कुछ खट्टा हो जाये'चे टीझर पोस्टर खूपच मजेदार दिसत आहे. या पोस्टरच्या पार्श्वभूमीत प्रेमाचे प्रतीक ताजमहाल दिसत आहे. या चित्रपटाच्या टीझर पोस्टरनंतर उद्या टीझर प्रदर्शित होणार आहे. गुरू आणि सईचे चाहते त्यांच्या या आगामी चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहेत.

गुरू रंधावा आणि सई मांजरेकर स्टारर हा चित्रपट एक हृदयस्पर्शी कौटुंबिक कॉमेडी आहे. ज्यात नाटकाचा स्पर्श आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कुछ खट्टा हो जाए या चित्रपटाचे दिग्दर्शन जी. अशोक यांनी केले आहे. तर अमित आणि लविना भाटिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro Yellow Line : खुशखबर! मेट्रोची पिवळी मार्गिका सज्ज, कधीपासून सुरु होणार? महत्वाची माहिती समोर

Marathi Morcha in Mira bhayandar:माझ्या रक्तात आणि ओठांवर मराठी; मुस्लिम महिला कडाडली, नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल | VIDEO

Bhandara : खराब रस्त्यावरील चिखलात अडकली रुग्णवाहिका; गर्भवती महिलेला चिखलातून काढावी लागली वाट

Mehandi Designs: श्रावन महिन्यात या सुंदर मेहंदी डिझाईन्सने तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवा

Maharashtra Politics : मराठी मोर्चावरून रात्री साडेतीन वाजता अटक करता? ही तर आणीबाणी; ठाकरे गटाची सत्ताधाऱ्यांवर आगपाखड

SCROLL FOR NEXT