Puneet Superstar Instagram Disable Saam TV
मनोरंजन बातम्या

Puneet Superstar Instagram Disable : सोशल मीडिया सेंसेशन पुनीत सुपरस्टार इंस्टाग्राम अकाउंट गायब; फॅन्स म्हणाले, याला एमसी स्टॅनच जबाबदार...

Puneet Superstar News : इंस्टाग्रामने पुनीत सुपरस्टार अकॉउंट डिसेबल केले आहे.

Pooja Dange

Puneet Superstar Fans Target MC Stan :

सोशल मीडिया सेंसेशन पुनीत सुपरस्टार त्याच्या अतरंगी व्हिडीओसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे व्हिडीओ पाहून काहींच्या तर डोक्यात तिडीक जाते. बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर त्याच्या हरकतींनी त्याने सगळ्यांचे डोके भंडावून टाकले होते. त्यामुळे त्याला २४ तासाचं बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यात आले.

पुनीत सुपरस्टार सध्या चर्चेत आहे. त्यांच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. इंस्टाग्रामने पुनीत सुपरस्टार अकॉउंट डिसेबल केले आहे. पुनीतचे अकाउंट डिसेबल झाल्यानंतर त्याच्या फॅन्सनी बिग बॉसमधील स्पर्धांना टार्गेट करणं सुरू केलं आहे.

सोशल मीडियावर पुनीत सुपरस्टार खूप लोकप्रिय आहे. त्याचे इंस्टाग्रामवर ३.१ मिलियन फॉलोवर आहेत. पुनीत सुपरस्टार विचित्र व्हिडीओ बनवून लोकांना हसवतो. काही लोकंना त्याचे हे व्हिडीओ क्रिंज वाटतात. पुनीत सुपरस्टारचे इंस्टाग्राम अकाउंट दिसत नसल्याने त्याचे फॅन्स ट्विटर इंस्टाग्रामचे स्क्रीन शॉट्स शेअर करत आहेत. (Latest Entertainment News)

पुनीत सुपरस्टारचे अकाउंट डिसेबल झाल्याने फॅन्स नाराज आहेत. तसेच अकाउंट परत आणावे अशी मागणी करत आहेत. पुनीत सुपरस्टारच्या फॅन्सचे म्हणणे आहे की, एमसी स्टॅनच्या आर्मीने अँकेड त्याचे अकाउंट रिपोर्ट केले आहे. त्यामुळे पुनीतचे अकाउंट डिसेबल झाले आहे.

पुनीत सुपरस्टारचे सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवरून डिसेबल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना त्यांचा राग अनावर झाला आहे आणि त्यांनी इन्स्टाग्रामला अनफेअर म्हटले आहे. एका युजरने ट्विट केले की, "पुनीत सुपरस्टारच्या अकाउंटची mc stan's Army ने अनेक वेळा तक्रार केली आहे. त्यामुळे त्याचे खाते लॉक झाले आहे".

पुनीत सुपरस्टार जेव्हा बिग बॉस ओटीटी 2 च्या मंचावर आला तेव्हा रॅपर एमसी स्टॅनने त्याच्या कंटेंटला क्रिंज म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surendra Pathare-Aishwarya Pathare: बाप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार, लेक अन् सून भाजपचे नगरसेवक; पुण्यात कुटुंब जिंकले

Municipal Election Result: सांगली, मिरज महापालिकेत भाजप काठावर पास; फक्त एका जागावर गेम अडला

पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचा बोलबाला; वाचा विजयी उमेदवारांची यादी

Nashik results : नाशिकमध्ये ठाकरेंना अपयश, भाजपची एकहाती सत्ता, वाचा विजयी उमेदवारांची यादी

Municipal Elections Result: कोल्हापुरात महायुतीचा गुलाल, काँग्रेसचा निसटता पराभव, करवीरनगरीत नगरसेवकाचे गणित काय?

SCROLL FOR NEXT