Priyanka Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रानं शेअर केला बाथरूममधील व्हिडिओ, चाहतेही पडले विचारात!

सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या प्रियांका चोप्राने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर एक पोस्ट शेअर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या प्रोफेशनल लाईफपासून पर्सनल लाइफपर्यंत प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते. सोशल मीडियावर(Social Media) नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या प्रियांकाने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रियंका चोप्राने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याने तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅंडलवरील नवीन व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्राने मिरर सेल्फीसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बाथरूमच्या आरशासमोर उभी असलेली दिसत आहे. ती आरशावर स्वतःच्या हाताने २६ ऑगस्ट ही तारीख लिहिते. आता या पोस्टवर प्रियांकाचे चाहते व्यक्त होत आहेत.

तिच्या पोस्टमध्ये प्रियांका आरशावर तारीख लिहून काहीतरी सूचित करत आहे असे दिसून येते. तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मी हे रीव्हिल करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही'. आता २६ ऑगस्ट २०२२ रोजी प्रियांका कोणता मोठा खुलासा करणार आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. चाहत्यांचा अंदाज आहे की कदाचित तिचा एखादा सिनेमा येणार आहे, ज्याची ती तिच्या चाहत्यांना हिंट देत आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, प्रियांका लवकरच 'जी ले जरा' या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. तसेच 'शीला' हा सिनेमाही त्याच्यासाठी या वर्षातील मोठा सिनेमा आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त त्याच्याकडे हॉलिवूडचे प्रोजेक्ट्स आहेत. अँथनी मॅकीसोबत ती 'एंडिंग थिंग्स' या सिनेमात आणि 'सिटाडेल' या आगामी वेब सीरीजमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अस्थी विसर्जन करून परतताना भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

Thusrday Horoscope : विजयादशमी असली तरी आयुष्यात अडचणी येणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात संकटे

SCROLL FOR NEXT