Priyanka Chopra's Daughter Instagram @priyankachopra
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra's Daughter: आईपेक्षा लेक सुंदर; प्रियांका चोप्राने अखेर मुलीचा चेहरा दाखवलाच...!

ग्लोबल स्टारने प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.

Pooja Dange

Priyanka Chopra Reveals Her Daughter Face on Social Media: प्रियांका चोप्रा जोनस एक ग्लोबल व्यक्तिमत्व झाले आहे. परंतु प्रियंकाने मुलगी मालती हिला सेरोगसीच्या माध्यमातून जन्म दिल्याने ती ट्रोल झाली होती. त्यानंतर प्रियंकाने ब्रिटिश वोग या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या मागचे कारण स्पष्ट केले होते.

जोनास ब्रदर्सच्या हॉलीवूड वॉक ऑफ फेम कार्यक्रमात मालती मेरीचा चेहरा जगासमोर आला होता. मात्र, त्यानंतरही प्रियांका आणि निक यांनी मालतीचा चेहरा त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शेअर केला नव्हता.

आता मात्र ग्लोबल स्टारने प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मुलीचा चेहरा उघड केला आहे. रविवारी सकाळी प्रियंका चोप्राने अखेर मालतीचा चेहरा दाखवणारा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. तिने तिला जवळ धरले आणि मालतीचा गोंडस चेहरा आणि गुलाबी रंग दाखवत एक सेल्फी काढला. तर दुसर्‍या फोटोमध्ये निकसोबत बेडवर असल्याचे दिसत आहे, तिने मालतीला तिच्या कुशीत घेतले आहे आणि तिच्या हाताने चेहरा लपवला आहे.

तिने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले आहे, “असे दिवस.” तिच्या या पोस्टवर तिचे चाहते भरभरून कमेंट करत आहेत. “हे सर्वात मौल्यवान दिवस आहेत. आनंद घ्या,” एका चाहत्याने लिहिले. "खूप सुंदर!! हृदयस्पर्शी,” दुसर्‍याने कमेंट केली आहे. "ओ निक्सच्या आवडत्या स्त्रिया नेहमीप्रमाणे सुंदर दिसतात," अशी कमेंट एकाने केली आहे.

व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी प्रियांकाने निक आणि मालतीसोबतचे फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये प्रियांका निकसोबत सेल्फी काढला होता. तर एका फोटोमध्ये प्रियंका मालतीला हातात धरले आहोत आणि समोर असलेल्या दृश्याचा आनंद घेत होती.

हे फोटो शेअर करताना प्रियंकाने एक कॅप्शन देखील दिले होते, "माझे कायमचे व्हॅलेंटाईन... तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा." प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक छोटासा व्हिडिओही शेअर केला होता. "माझा प्रत्येक दिवस निक जोनाससोबत व्हॅलेंटाईन आहे," असे तिने त्या व्हिडिओसोबत लिहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT