Kareena Kapoor0Ranbir Kapoor Saam TV
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Replace Kareena : प्रियंका - रणवीर नव्हे तर 'दिल धडकने दो'मध्ये दिसले असते रणबीर - करीना, पण झालं असं की...

Dil Dhadakne Do Cast: रणबीर कपूर- करीना कपूर खान हे दोघेही एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार होते.

Pooja Dange

Kareena - Ranbir Sharing Screen : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक झोया अख्तरच्या 'दिल धडकने दो' चित्रपटाला ५ जूनला ८ वर्ष पूर्ण झाली. हा चित्रपट ५ जून १०१५ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये करिना कपूर खान - रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार होते. पण काही कारणांनी चित्रपटाचे संपूर्ण कास्टचं बदलण्यात आलं.

झोया आणि फरहान यांच्या विचारातून साकारण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये दोन कपूर भावंड ऑनस्क्रीन एकत्र काम करणार होते. या दोघांना एकत्र पाहणे ही देखील एक पर्वणीच असणार होती. दोघांनी चित्रपट करण्यास होकार दिला होता पण नंतर दोघांनीही चित्रपटामध्ये काम करणार नाही असे सांगितले. (Latest Entertainment News)

रणबीर-करीना साकारणार होते ऑनस्क्रीन भांवड

रणबीर कपूर- करीना कपूर खान हे दोघेही एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार होते. त्यांना जेव्हा चित्रपटाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी होकारही दिला होता. पण करीनाचे मात्र एक अट होती. तिची अट अशी होती की, जर रणबीर कपूर जर चित्रपटामध्ये माझ्या भावाची भूमिका करत असेल तरच मी चित्रपटामध्ये काम करेन.

रणबीरनेही सुरवातीला चित्रपटामध्ये काम करण्यास होकार दिला होता. पण त्यांच्या शुटींगच्या तारखांचा प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे ऐनवेळीस त्याने नकार दिला. करीनाने चित्रपटामध्ये काम करण्यासाठी आधीच अट ठेवली होती. त्यामुळे करीनानेही चित्रपटाला नकार दिला. त्यामुळे रणबीर कपूरच्या जागी रणवीर सिंग तर करीनाच्या जागी प्रियंका चोप्रा जोनस चित्रपटामध्ये दिसले.

रणबीर आणि रणवीरच्या बाबतीत हे पहिल्यांदा होत नव्हते. याआधीही रणवीरने रणबीरला विचारण्यात आलेले रोल केले आहेत. संजय लीला भन्साली यांचा 'गोलियों की रासलीला' आधी रणबीरला विचारण्यात आला होता. तर अनुराग कश्यपच्या 'बॉम्बे वेलवेट'साठी आधी रणवीर सिंगला विचारण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT