Priyanka Chopra With Her Family  Saam TV
मनोरंजन बातम्या

Priyanka-Nick At Airport: बहिणीच्या लग्नासाठी प्रियांका मुंबईत दाखल; नवरा आणि मुलीसोबतचा क्युट व्हिडिओ व्हायरल

Priyanka-Nick Spotted In Mumbai: प्रियांकाचे संपूर्ण कुटुंब आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाले आहे.

Pooja Dange

Priyanka Chopra For Parineeti's Wedding: अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. बॉलिवूडविषयी केलेल्या खुलाश्यांमुळे अनेकांना धक्का बसला असेल. बॉलिवूडविषयी केलेल्या वक्तव्यानंतर आता अभिनेत्री पती निक आणि मुलगी मालतीसह भारतात आली आहे. प्रियांकाचे संपूर्ण कुटुंब आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाले आहे.

मीडिया अहवालात प्रियांका, नीता अंबानी यांच्या सांस्कृतिक केंद्राच्या उद्दघाटनासाठी येथे आल्याचे सांगण्यात आले आहे. तर तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे की ती बहीण परिणीती चोप्राच्या लग्नासाठी भारतात आली आहे.

काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा यांना एकत्र स्पॉट करण्यात आले होते. तेव्हापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. अनेक सेलिब्रिटींनी या दोघांचे अभिनंदन केले आहे. परंतु परिणितीकडून यावर अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

परिणितीच अकाल एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यात एका पापाराझीने तिला तिच्या लग्नाविषयी विचारले असत ती लाजली होती. त्यामुळे या चर्चा खऱ्या असल्याचे मानले जात आहे.

मुंबई विमानतळावरील व्हिडिओमध्ये प्रियंकाने पिंक ड्रेस घातला आहे. तर निकने ब्लू स्वेटशर्ट आणि मालतीने ग्रे फ्रॉक घातला आहे.

प्रियांका नेहमीच मालतीसोबतचे फोटो शेअर करत असते. हॉलिवूड वॉक फेम या जोनास ब्रदर्सच्या सन्मानासाठी आयोजित कार्यक्रमात प्रियंकाने पहिल्यांदा मालतीचा चेहरा दाखवला होता. त्यानंतर मालतीची सगळीकडे चर्चा होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Rain: सोलापुरात मुसळधार पाऊस; रिक्षाचालक गेला वाहून |VIDEO

Maharashtra Live News Update: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

बाहेर कॉम्प्यूटर सेंटरचं पोस्टर, आत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी तरूणींना रंगेहाथ पकडलं

Curd Water : दह्याला सुटलेले पाणी प्यावे की टाकून द्यावे? वाचा तज्ज्ञांचे मत

Weekly Horoscope : मिथुन, मीनसह ७ राशींना पूर्वजांचा आशीर्वाद; खुलणार करिअरचे दरवाजे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT