Priyanka Chopra Necklace Saam Digital
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Necklace : प्रियंकाच्या गळ्यात 358 कोटींचा हिरेजडीत नेकलेस; 200 कॅरेटच्या 7 हिऱ्यांचा हार

Priyanka Chopra Necklace Price : प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आहे, यावेळी चर्चेचं कारण थोडं अलिशान आहे. प्रियंका तिच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते यावेळी चर्चेंचं कारण मात्र कोट्यवधींचं आहे.

साम टिव्ही ब्युरो

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आहे, यावेळी चर्चेचं कारण थोडं अलिशान आहे. प्रियंका तिच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते यावेळी चर्चेंचं कारण मात्र कोट्यवधींचं आहे. प्रियंका चोप्रानं नेमकं काय केलंय? काय झालंय? या सगळ्यांची उत्तर या रिपोर्टमधून घेऊ.

दागिने पाहून अनेकदा प्रश्न पडतो की, त्याची किंमत नक्की किती असावी, कोट्यवधींच्या घरात असली तरी नेमकी किती असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. अलिकडेच ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा बल्गेरी इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या सोहळ्यातील तिनं परिधान केलेला हिरेजडीत नेकलेस चर्चेचा विषय ठरलाय..या हाराची किंमत फक्त 358 कोटी रुपये आहे.

बल्गेरी इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्रानं क्रीम अँड ब्लॅक ऑफ शोल्डर गाऊनमध्ये एन्ट्री घेतली. यावेळी तिच्या गळ्यात अतिशय महागडा डायमंड नेकलेस घातलेला दिसला. हा 'बल्गेरी' ब्रँडचा सर्वात महागडा नेकपीस आहे. हिरेजडीत नेकलेस बनवण्यासाठी 2 हजार 800 तास लागले. या नेकपीसमध्ये 7 हिरे आहेत. 200 कॅरेट हिऱ्यांचा समावेश असलेला या सुंदर नेकलेसची किंमत 43 मिलियन डॉलर अर्थात 358 कोटी रुपये आहे. सध्या या महागड्या नेकलेसची तुफान चर्चा रंगली आहे.

प्रियंकाकडे अनेक महागड्या वस्तू

प्रियंका सर्वाधिक महागड्या अभिनेत्रींपैकी एक

प्रियंका कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीची मालकीण

रोल्स रॉयस असणारी बॉलिवूडची पहिली अभिनेत्री

प्रियंका अनेक आलिशान घरांची मालकीण

मुंबईसह लॉस एंजेलिसमध्येही आलिशान बंगले

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या लग्नामुळेही चर्चेत आली होती. आलिशान आयुष्य जगणारी प्रियंका इतर अभिनेत्रीपेक्षा नेहमीच काहीतरी हटके करत असते आता तीनं घातलेल्या नेकलेसची चर्चा जगभर होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला, संतापलेल्या बापाने तरुणाला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; दीड वर्षांनंतर...

MHADA: घराचं स्वप्न लांबणीवर! लॉटरीसाठी म्हाडाकडून नवा मुहूर्त; घरांसाठी कधी निघणार सोडत?

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे बाणेरमध्ये वाहतूक ठप्प

Nandurbar : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी महिलेचा प्रेरणादायी निर्णय; जुळ्या मुलांचं सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन, VIDEO

Cardiac Arrest: कार्डियक अरेस्ट अन् हार्ट अटॅकमध्ये फरक; कोणती लक्षणे दिसतात?

SCROLL FOR NEXT