Priyanka Chopra Big Decision About Sona Restaurant In New York Instagram @priyankachopra
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Big Decision In Restaurant: प्रियंका चोप्राने सोडली ‘सोना’ रेस्टॉरंटची मालकी, वृत्त ऐकून चाहत्यांनाही पडला प्रश्न

Priyanka Chopra News: अभिनेत्रीने न्यूयॉर्कमधील ‘सोना’ रेस्टॉरंटची स्वत:ची भागीदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Chetan Bodke

Priyanka Chopra Big Decision About Sona Restaurant In New York

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये ही आपल्या उत्तम अभिनय कौशल्यातून यशाचं शिखर गाठलं. प्रियंकाच्या निस्सिम सौंदर्याची भूरळ प्रेक्षकांवर आजही कायम आहे. स्वत: जवळ अभिनयाची पार्श्वभूमी नसताना तिने यशाचे शिखर गाठले. प्रियांकाने फक्त अभिनयातच नाही तर विविध क्षेत्रातील बिझनेसमध्येही आपलं नशीब आजमावलं. अभिनेत्रीने दोन वर्षांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये नवीन रेस्टॉरंट सुरू केलं होतं. तिच्या रेस्टॉरंटचं नाव ‘सोना’ असून तिने बिझनेसबद्दल महत्वाचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने त्या रेस्टॉरंटमधून स्वत:ची भागीदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रियंकाने बिझनेसच्या माध्यमातून तिचं एक स्वप्न पूर्ण केलं. प्रियंकाच्या न्यूयॉर्कमधील ‘सोना’ रेस्टॉरंटमध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटींनी जेवणाची चव चाखण्यासाठी हजेरी लावली होती. अनेक सेलिब्रिटींनी तिच्या रेस्टॉरंटमधील जेवणाचं कौतुक केलं होतं.

पण आता त्याच रेस्टॉरंटमधून प्रियंकाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या रेस्टॉरंटमधील अभिनेत्रीने स्वत:चा मालकी हक्क सोडला आहे. प्रियंकानंतर त्या रेस्टॉरंटचे सह-संस्थापक मनीश के. गोयल रेस्टॉरंटचा कारभार पाहत आहेत.

प्रियंकाची आणि मनीश के. गोयल यांची ‘सोना’ रेस्टॉरंटमध्ये अर्धी हिस्सेदार असल्याची चर्चा आहे. मात्र त्या भागीदारीतूनच अभिनेत्रीने माघार घेतली आहे.

प्रियंकाने ‘सोना’ रेस्टॉरंटमधून स्वत:ची भागीदारी सोडण्याचा निर्णय का घेतला? याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होते. तिच्या या निर्णयामागचं नेमकं रहस्य काय? या निर्णया मागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या चाहते करत आहेत.

मनीष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंटच्या क्रिएटिव्हिटीमध्ये प्रियांकाने खूप मदत केली होती. तिने या रेस्टॉरंटसाठी केलेला सपोर्ट आमच्यासाठी खूपच महत्वाचा होता. प्रियांका आता ‘सोना’ रेस्टॉरंटची क्रिएटिव्ह पार्टनर जरी नसली, तरी ती त्या रेस्टॉरंटच्या कुटुंबाचा एक भाग आहे, अशी प्रतिक्रिया मनीष गोयल यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT