Actress Priya Bapat Pregnant Look Viral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priya Bapat: प्रिया बापट प्रेग्नंट? सोशल मीडियावर त्या फोटोमुळे चर्चेला उधाण

Actress Priya Bapat Pregnant Look Viral: अभिनेत्री प्रिया बापटने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती प्रेग्नंट लूकमध्ये दिसत आहे. यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

Manasvi Choudhary

अभिनेत्री प्रिया बापट एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नात्यांची नवी परिभाषा सांगणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचे नाव बिन लग्नाची गोष्ट आहे. येत्या १२ सप्टेंबरला चित्रपट रिलीज होणार आहे. नुकतंच या चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सोशल मीडियावर प्रियाने याबाबतची पोस्ट देखील शेअर केली आहे. जी सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर प्रिया चित्रपटांविषयी अपडेट देत असते. आगामी चित्रपटातील प्रियाचं 'पण या इगो चं' हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

प्रियाची सोशल मिडिया पोस्ट

प्रिया बापटने चित्रपटातील प्रेग्नंट फोटो पोस्ट केला आहे. यामुळे सुरूवातीला प्रिया हिने गुडन्यूज दिली की काय असे वाटलं. मात्र प्रियाने प्रेग्नंट नसून प्रियाच्या चित्रपटातील खास लूक आहे. फोटो शेअर करत प्रियाने, 'गाणं पाहिलं का?? चित्रपट येतोय १२. सप्टेंबर ला' 'बिन लग्नाची गोष्ट'असा कॅप्शन दिला आहे.

प्रियाच्या पोस्टची रंगली चर्चा

सोशल मीडियावर प्रियाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रियाने प्रेग्नेसीदरम्यानचा फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांना ती प्रेग्नंट असल्याचं वाटलं आहे. प्रियाच्या फोटोवर एका नेटकऱ्याने, 'मला वाटला good news आहे' आणखी एकाने, प्रिया तू प्रेग्नंट आहेस नक्की, उमेश तूला पण खूप खूप अभिनंदन असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT