Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात सुरू झाली प्रश्न-उत्तरांची शाळा; उत्तर देताना स्पर्धकांची बत्ती गुल...

Bigg Boss Marathi 5 Press Conference : बिग बॉसच्या स्पर्धकांची शाळा घ्यायला घरात पत्रकार मंडळी आले आहेत. प्रश्न-उत्तरांचा हा खेळ कसा रंगणार जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi) हे पर्व खूपचं गाजत आहे. प्रेक्षकांना स्पर्धकांचा गेम खूप आवडत आहे. चाहते आपापल्या आवडत्या सदस्यावर भरपूर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आजवर भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांची शाळा घेत होते. आता मात्र बिग बॉसच्या घरात प्रश्न-उत्तरांचा खेळ खेळण्यासाठी पत्रकार मंडळी आले आहेत. बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद होणार आहे.

आज बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद (Press Conference ) रंगणार आहे. जनतेचे प्रश्न पत्रकार घरातील सदस्यांना विचारणार आहेत. स्पर्धक या प्रश्न- उत्तराच्या खेळाला कसे सामोरे जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. या पत्रकार परिषदेचे होस्टिंग सर्वांना हसवणारे निलेश साबळे करत आहेत.

आज बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, पत्रकार मित्र स्पर्धकांवर प्रश्नांचा भडिमार करणार आहेत. कोणाच्या नात्यावर तर कोणाच्या गेमवर पत्रकारांनी प्रश्न निमार्ण केले आहे. पत्रकारांनी निक्की- अरबाजच्या नात्यावर भन्नाट प्रश्न विचारला. पत्रकार अरबाजला प्रश्न विचारतात की, "शो संपल्यावर निक्कीशी नातं तसचं राहणार आहे का?" तर निक्कीला असा प्रश्न केला जातो की, "तुला वाटतंय का की अरबाज आता घरातून जाईल आणि तुला दुसरा साथीदार पाहिजे?" आता या प्रश्नांवर निक्की अरबाज काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बिग बॉसच्या घरात इतर सदस्यांना देखील प्रश्नांना सामोरे जावे लागले. "तुला अभिजीतचा इश्यू आहे का?" असा प्रश्न डीपी दादाला करण्यात आला. तर तू "गेम कधी दाखवणार" असा सवाल सूरजला करण्यात आला. जान्हवीला तिच्याकडून काय चुकले असे विचारण्यात आले. यासर्व प्रश्नांवर स्पर्धक काय उत्तर देणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. बिग बॉसच्या या नव्या प्रोमोवर अनेक नेटकऱ्याच्या कमेंट्स येत आहेत.

या आठवड्यात अरबाज कॅप्टन झाला आहे तर दुसरीकडे वर्षा ताईंनी आपली टीम बदलली आहे. भाऊच्या धक्क्यावर काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT