Tejashri Pradhan Instagram @tejashripradhan
मनोरंजन बातम्या

Tejashri Pradhan On Cricket: रोहित, विराट लांबच राहिले, तेजश्री प्रधान भारतीय क्रिकेटपटूंना नाहीतर या खेळाडूला करते फॉलो

Tejashri Pradhan Serial: तेजश्री प्रधान स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून आपल्या भेटीला येते.

Pooja Dange

Tejashri Pradhan Favorite Cricketer:

अभिनेत्री तेजश्री प्रधान स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून आपल्या भेटीला येते. ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. टीआरपी रेटिंगमध्ये ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. मालिकेमुळे तेजश्री प्रधान पुन्हा प्रसिद्धी झोतात आली आहे. तेजश्रीविषयी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

सध्या सर्वत्र क्रिकेटची धूम आहे. 'क्रिकेट वर्ल्ड कप' सुरू असल्याने सर्वत्र त्याच चर्चा आहे. दरम्यान तेजश्रीने देखील ती क्रिकेटची फॅन असल्याचे सांगितले आहे. एक कार्यक्रमात तेजश्रीने तिचा आवडता खेळ आणि खेळाडू कोण आहेत, हे सांगितले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेजश्री प्रधानला एका कार्यक्रमादरम्यान तिच्या आवडत्या खेळाडूविषयी आणि ती कोणत्या खेळाडूला फॉलो करते असे विचारण्यात आले. 'क्रिकेट खूप आवडत. प्रत्येक मॅचचे अपडेट देखील मी ठेवते. सेटवर असताना सारखं कॉल करून मॅचमध्ये काय सुरु आहे, किती विकेट्स गेले, आता काय होईल? हे सगळं मी विचारात असते.

मी वर्षानुवर्षे म्हणजे अगदी लहानपणापासून ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीला फॉलो करते. तो आता खेळात नाहीये. अजिंक्य राहणे हा माझा वन ऑफ द फेवरेट खेळाडू आहे.' असे तेजश्रीने यावेळी सांगितलं.

तेजश्री प्रधानचा लूक

स्टार प्रवाह आयोजित 'ढिंच्याक दिवाळी' या कार्यक्रमात मालिकेतील सर्व कलाकार सहभागी झाले होते. दरम्यान या कार्यक्रमाला तेजश्री प्रधानने देखील हजेरी लावली होती. यावेळी तेजश्री डार्क ग्रीन रंगाचा लेहेंगा घातला होता. या लेहेंग्यावर गोल्डन रंगाचे वर्क होते. कपाळावर टिकली, हातात गोल्डन बांगड्या, कानात लेहेंग्याला मॅचिंग कानातले असा तेजश्रीचा एकूण लूक होता. तेजश्री या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. (Latest Entertainment News)

'प्रेमाची गोष्ट' कथा

तेजश्री प्रधान खूप वर्षांनी टीव्ही मालिकेत (Serial) पदार्पण केले आहे. 'अग्गंबाई सासूबाई' या झी मराठीवरील मालिकेनंतर तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून प्रेक्षांच्या भेटीला आली आहे. सध्या मालिकेत मुक्ता आणि सागर यांच्यात वाद दाखविला आहे. सागरचा त्याच्या बायकोशी घटस्फोट झाला आहे. त्याच्या मुलीच्या कस्टडीसाठी तो लढत आहे. तर मुक्ता डेंटिस्ट आहे. तिला बाळ होऊ शकत नाही. त्यामुळे तिचे लग्न ठरत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT