Ileana D'Cruz finally REVEALS her mystery man Saam TV
मनोरंजन बातम्या

Ileana D'Cruz Mystery Man : नेटकऱ्यांची बोलती बंद ! इलियानाने सांगितलं तिच्या होणाऱ्या बाळाचे बाबा कोण ?

Ileana D'Cruz Baby's Dad : इलियानाने मिस्ट्रीमॅनसोबतचा फोटो शेअर केला आहे.

Pooja Dange

Ileana D'Cruz finally REVEALS her mystery man : अभिनेत्री इलियाना डिक्रुझ सध्या तिच्या प्रेगन्सीच्या शेवटच्या टप्यात आहे. तिने तिच्या बाळाच्या वडिलांचे नाव गुप्त ठेवले होते. नुकतीच इलियानाने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या मिस्ट्रीमॅनसोबतच फोटो शेअर केला आहे.

इलियाना ती आई होणार असल्याची बातमी शेअर केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. त्यानंतर अविवाहित इलियानाच्या बाळाचे बाबा कोण आहेत याची चर्चा सुरू झाली. (Latest Entertainment News)

या चर्चेनंतर इलियानाने तिच्या पार्टनरचा आणि तिचा एक ब्लुर फोटो शेअर केला. त्यानंतर तो फोटो पाहून अनेकांनी अनेक नवे घेत अंदाज बांधायला सुरुवात केली. अखेर इलियानाने तिच्या पार्टनरची ओळख उघड केली आहे.

इलियानाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये ती तिच्या पार्टनरसोबत नाईट डेटला गेली असल्याचे तिने सांगितले आहे. हा त्या फोटोमधीलच व्यक्ती आहे जो इलियानाने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता.

तर इलियानाने तिच्या पार्टनरसोबतच्या इंस्टाग्राम स्टोरीआधी कतरीनाचा फोटो पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Ileana D'Cruz finally REVEALS her mystery man

यापूर्वी अशी बातमी आली होती की इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत आहे. 2022 मध्ये मालदीवमध्ये कतरिना, विकी कौशल, सेबॅस्टियनसोबत सुट्टी घालवताना दिसल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या.

इलियानच्या वर्कलाईएफविषयी बोलायचे झाले तर, इलियाना बादशाह आणि गोल्डकार्ट्जच्या 'सब गजब' या गाण्यात दिसली . तिचे गाणे रिलीज झाल्यानंतर तिने तिच्या गरोदरपणाची बातमी जाहीर जाहीर केली. अभिषेक बच्चनसोबतचा 'द बिग बुल' हा तिचा शेवटचा चित्रपट होता. तिच्याकडे आता अनफेअर, लव्हली, प्रेमी चित्रपट आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT